करमाड : औरंगाबाद तालुक्यातील शेकटा येथील शेतकºयांच्या कापसाच्या पेमेंटसह स्थानिक कापूस व्यापाºयाच्या कमिशनची रक्कम न दिल्याप्रकरणी गुजरातच्या कापूस व्यापाºयाविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाºयाने दोन वर्षांनंतरही ८० लाख रुपये दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शेकटा येथील संतोष निवृत्ती वाघ यांचा कापूस खरेदीचा व्यवसाय असून, त्यांची ओमसाई कॉटन ग्रुप नावाची कंपनी आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, २०१६ मध्ये सोमनाथ कॉटन जिनिंगचे मालक राजूभाई जोशी यांच्याशी माझा तोंडी करार झाला. त्यानुसार मी शेकटा परिसरातील शेतकºयांचा कापूस खरेदी करून सोमनाथ कॉटन जिनिंगला विक्री करून त्या मोबदल्यात ही कंपनी मला ७० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे कमिशन देण्याचे ठरले होते. ७ नोव्हेंबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत गौरव जोशी व राकेश आचारी हे शेकटा येथे येऊन कापसाची प्रतवारी पाहून कापसाचे ट्रक कंपनीकडे पाठवत होते. तोपर्यंत त्यांनी २०८ ट्रकमधून २७ हजार १४५ क्विंटल कापूस कंपनीला पाठविला. त्याची किंमत १५ कोटी ५४ लाख ७६ हजार ७७५ रुपये होते. दरम्यान, त्यांनी १४ कोटी ७४ लाख ६० हजार ७१० रुपये शेतकºयांना आरटीजीएसद्वारे बँक खात्यात जमा केले.
परंतु त्यानंतर उर्वरित ६१ लाख ७० हजार ६८६ रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले नाहीत. तसेच कमिशनचे १९ लाख १५० रुपये मला दिले नाही. असे एकूण ८० लाख ७० हजार ८३६ रुपये बाकी असल्याने दोन वर्षांपासून कंपनी मालक जोशी व व्यवस्थापक अजय जोशी यांच्याशी वारंवार संपर्क साधून पैशाची मागणी केली. तसेच मी राजकोटला जाऊन आलो. शेतकरी मला पैशाची मागणी करीत असून, मला त्रास होत असल्याचे सांगितले. शेकटा येथील काही जणांना सोबत घेऊन राजकोट येथे कंपनीत गेलो. यावेळी राजू जोशी, अजय जोशी, गौरव जोशी, राकेश जोशी यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संतोष वाघ यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.