शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
3
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
4
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
5
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
6
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
8
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
9
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
10
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
11
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
12
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
13
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
14
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
15
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
16
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
17
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
18
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
19
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
20
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

८० वर्षांची आजी रिकामी घागर घेऊन मोर्चात, मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही भेटावे, फडणवीसांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 12:02 PM

महाविकास आघाडी सरकारने पाणी योजनांचा बट्ट्याबोळ केल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांची टीका; औरंगाबादेत भाजपचा जलआक्रोश मोर्चा

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने पाण्याच्या योजनांचा मुडदा पाडला. वैधानिक विकास मंडळ संपविले. मराठवाडा वॉटर ग्रीडची माती केली. दमणगंगेचे पाणी विभागाकडे येणाऱ्या योजनांचा अध्यादेश आमच्या सरकारच्या काळात झाला; परंतु, पुढे या सरकारने काही केले नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केला. तसेच मुंबईतील फायर आजींच्या घरी जाऊन मुख्यमंत्री भेटले. मग, आज मोर्चात ८० वर्षे असलेल्या आजी रिकामी घागर घेऊन सहभागी झाल्या. या आजींच्या घरीही भेट द्यावी, असे आव्हान फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धडकलेल्या जलआक्रोश मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले. महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप करत १६८० कोटी रुपयांची शहर पाणीपुरवठा योजना महाविकास आघाडी सरकारच्या वाटाघाटींमुळे पुढील २५ वर्षेदेखील पूर्ण होणार नाही, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली. भाजपने २०१३ नंतर प्रथमच स्वबळावर मोर्चा काढून शिवसेनेच्या गडात धुरळा उडविला. पैठण गेटपासून महापालिकेपर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. गिरीश महाजन, आ. अतुल सावे यांच्यासह हजारो नागरिकांचा सहभाग होता.

पहिल्यांदाच भाजपचा महापालिकेवर मोर्चाशिवसेनेसोबत ३० वर्षांचा सत्तेच्या वाटाघाटी २०१९ मध्ये फिसकटल्या. दोन वर्षांपासून शिवसेना आणि भाजपत महापालिकेच्या राजकारणावरून कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू असून सोमवारी भाजपाने शिवसेनेच्या गडात पूर्ण ताकदीने धुराळा उडवित जोरदार जलआक्रोश मोर्चा काढला. यापूर्वी विभागीय पातळीवरून गर्दी करण्याचे नियोजन केले जात असे, परंतु यावेळी शहरातील संघटनेवरच मोर्चा काढून भाजपाने स्वबळ आजमावले. २०१३ साली भाजपने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला होता. त्यानंतर ९ वर्षांनी भाजपाने मनपातील सत्ता परिवर्तनासाठी मोर्चातून रणशिंग फुंकले.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांचे नियोजनमोर्चासाठी पूर्ण ताकद केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी लावली. गेल्या आठवडाभर ते मोर्चाच्या नियोजनासाठी शहरात होते. तसेच काही वॉर्डांमध्ये जाऊन त्यांनी बैठका घेत पाणीपुरवठ्याची समस्या जाणून घेतली. नागरिकांनी मोर्चात येण्याचे आवाहनही त्यांनी केले. निमित्ताने भाजपला साम, दाम, दंड, भेद या नीतीने मैदानात उतरण्याची संधी मिळाली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेwater scarcityपाणी टंचाई