नांदेड : शहर परिसरात विविध माध्यमांतून माध्यमिक शिक्षण देणाऱ्या १२० शाळा आहेत़ यशाचा दैदिप्यमान वारसा लाभलेल्या शाळांनी विद्यार्थीसंख्या अधिक असूनही निकालातील सरसी कायम राखली़ नांदेड जिल्ह्यातून यापैकी ३५ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली़ एकुण २६ हजार ६४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ यात १४ हजार २२८ मुले तर १२ हजार ४१९ मुलींचा समावेश आहे़ शहरी भागातील शाळांतील विद्यार्थीसंख्या कितीतरी पटीने अधिक होती़ नांदेड शहर व परिसरातील १२० शाळांमध्ये प्रवेशित असलेल्या १० हजार ३८१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ यापैकी ८ हजार २१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ जिल्ह्याच्या निकालाच्या आकडेवारीत यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जवळपास ३५ टक्के विद्यार्थी शहरी भागातील आहेत़ बाबानगर येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये ७८६ विद्यार्थी प्रविष्ट होते़ यापैकी ७०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ शाळेचा एकुण निकाल ८९़६ टक्के लागला़ गोकुळनगर येथील पीपल्स हायस्कूलचा निकाल ७५़११ टक्के लागला़ प्रतिभा निकेतन हायस्कूलमध्ये ५६४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते़ यापैकी ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ या शाळेचा निकाल ८४़५७ टक्के लागला़ केंब्रीज माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९़६९ टक्के लागला़ येथे ३२५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते़ राजर्षी शाहू विद्यालयातून २४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ यापैकी २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ या शाळेचा एकुण निकाल ८४़५५ टक्के लागला़ सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातील २०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ यापैकी १८१ विद्यार्थी यशस्वी ठरले़ प्रियदर्शनी विद्या संकुलातून १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ या शाळेचा निकाल ८१़१० टक्के लागला़ सना उर्दू हायस्कूलमधील २३४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली़ यापैकी २२८ जण उत्तीर्ण झाले़ वजिराबाद येथील गुजराती हायस्कूलमधून ३१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ यापैकी ३०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ शाळेचा निकाल ९६़७९ टक्के लागला़ मदीना उलूम हायस्कूलमधून ३९३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते़ यापैकी २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ सिडको येथील इंदिरा गांधी हायस्कूलचे २९२, कुसूमताई माध्यमिक विद्यालय १९३ तर शिवाजी विद्यालयातील २२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ग्रामीण भागातील शाळांचा निकालही यंदा उंचावला आहे़ जि़प़ हायस्कूल वाघी येथून १२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ यापैकी ९६ विद्यार्थी यशस्वी ठरले़ राष्ट्रमाता माध्यमिक विद्यालयातील १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे़ (प्रतिनिधी)महात्मा फुले शाळेत सर्वाधिक विद्यार्थीमहात्मा फुले हायस्कूल, गुजराती हायस्कूल, प्रतिभा निकेतन हायस्कूल, पीपल्स हायस्कूल, राजर्षी शाहू विद्यालय, टायनी एंजल्स शाळा, केंब्रीज विद्यालय, इंदिरा गांधी पब्लिक स्कूल, मदीना तुल उलूम हायस्कूल, इंदिरा गांधी हायस्कूल, शिवाजी विद्यालयात सर्वाधीक विद्यार्थी प्रविष्ट होते़ बाबानगर येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये जिल्ह्यात सर्वाधीक ७८६ विद्यार्थी होते़ यापैकी ७०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ विद्यार्थीसंख्या लक्षात घेता या शाळेने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे़ ग्रामीण भागातील शाळांचा निकालही यंदा उंचावला आहे़
नांदेडातून ८२१४ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
By admin | Published: June 18, 2014 1:17 AM