छत्रपती संभाजीनगर : जिल्हा उद्याेग केंद्राकडून २८५ व्यावसायिक, उद्योजकांना सुमारे ८ कोटी ३७ लाख ८३ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना उद्याेग, व्यवसाय करण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
बँकेमार्फत वाटप झालेल्या या कर्जावर शहरी भागासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला १५ टक्के, तर ग्रामीण भागातील लाभार्थ्याला २५ टक्के आणि अनुसूचित जाती, जमातीच्या अर्जदार, महिला आणि अपंगांना २५ ते ३५ टक्के अनुदान देण्यात येते. कर्जवाटप झाल्यानंतर तीन वर्षांनी जिल्हा उद्योग केंद्राकडून लाभार्थ्याच्या कर्ज खात्यात अनुदानाची ही रक्कम अदा करण्यात येते, असे केंद्राच्या सूत्रांनी सांगितले.
सन..........कर्जदारांची संख्या रक्कम२०२०-२१ ............५५........ १ कोटी ८७ लाख ९७ हजार२०२१-२२...........९४..........३ कोटी ६३ लाख ३ हजार२०२२-२३............. १३३............ २ कोटी ८५ लाख ८३ हजार
जिल्ह्यात मंजूर झालेल्या कर्जदारांची संख्या१ लाखापर्यंत मंजूर कर्ज संख्या - ३२१ ते २ लाखांपर्यंत मंजूर कर्ज - ६५२ ते ५ लाखांपर्यंत मंजूर कर्ज - १३३५ ते १० लाखांपर्यंत मंजूर कर्ज - २०९१० ते १५ लाखांपर्यंत मंजूर कर्ज - १११५ ते २५ लाखांपर्यंत मंजूर कर्ज - ३७२५ ते ५० लाखांपर्यंत मंजूर कर्ज - १६