औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज सर्व नऊ मतदारसंघांच्या कार्यालयात छाननी करण्यात आली. त्यात ३६ जणांचे ८४ उमेदवारी अर्ज बाद ठरले. पक्षाचा ‘ए’ व ‘बी’ फॉर्म जोडलेला नसणे, पुरेसे सूचक नसणे, सूचकांचे नाव मतदार यादीत नसणे इ. कारणांमुळे हे अर्ज बाद ठरविण्यात आले. जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये अखेरच्या मुदतीपर्यंत एकूण ३१८ जणांचे ४८० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्या सर्व अर्जांची आज सकाळी ११ वाजता छाननी सुरू झाली. सर्व नऊ विधानसभा मतदारसंघांच्या कार्यालयात ही छाननी पार पडली. तेव्हा काही अर्जांमध्ये नमूद सूचकांचे नाव संबंधित मतदार यादीत नसल्याचे आढळून आले. तर काही जणांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले असले तरी त्यांच्यासोबत पक्षाचा ‘ए’ व ‘बी’ फॉर्म जोडलेला नव्हता. त्यामुळे अशांचेही अर्ज बाद ठरले. याशिवाय काही जणांना पुरेसे सूचक नसणे, फॉर्म २६ व शपथपत्र शंभर रुपयांच्या बॉण्डवर नसणे इ. कारणांमुळे काही अर्ज बाद ठरले. छाननीत नऊ विधानसभा मतदारसंघांत २८३ व्यक्तींचे ३९६ अर्ज वैध ठरले. उर्वरित ३६ जणांचे ८४ अर्ज बाद झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १ आॅक्टोबर ही आहे. त्यामुळे या मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. १९६ अपक्ष उमेदवारनऊ मतदारसंघांमध्ये २८३ जणांचे अर्ज उरले आहेत. त्यामध्ये ५६ जण हे विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचे आणि ३१ जण हे नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार आहेत. तर उर्वरित १९६ जण हे अपक्ष उमेदवार आहेत. पूर्वमध्ये सर्वाधिक उमेदवार/२ मतदारसंघव्यक्तीअर्जांची संख्यासिल्लोड२५३४कन्नड२०२८फुलंब्री२१२८औरंगाबाद (म)४४५७औरंगाबाद (प)२९४२औरंगाबाद (पू)५०७४पैठण४१५०गंगापूर३५५०वैजापूर१८३३एकूण२८३३९६या मतदारसंघात छाननीमध्ये ३९ पैकी चौघांचे अर्ज अवैध ठरले आहेत. यामुळे ३५ जण निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज अवैध ठरलेल्यांमध्ये कारभारी जाधव (अपक्ष), राशी शिखावत (डावात मचाळा पार्टी), बाबासाहेब थोरात (अपक्ष) आणि सुनील पांडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.या मतदारसंघात २० उमेदवारांच्या ३७ अर्जांची छाननी सोमवारी करण्यात आली. यात विजया पाटील चिकटगावकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष संभाजी कलापुरे, जे.के. जाधव, मनसेचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांचे अर्ज ए.बी. फॉर्म जोडलेले नसल्याने अवैध ठरले. यामुळे आता १८ उमेदवारांचे ३३ अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नारायण उबाळे यांनी दिली. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात उमेदवारी अर्जांच्या छाननीत सोमवारी नऊ जणांचे ११ अर्ज बाद ठरले. एकूण ३३ जणांचे ५२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी गाझी सादोद्दीन जहीर अहमद, हरिभाऊ शेळके, सोमनाथ महापुरे, गजानन नांदूरकर, राहुल सावंत, विनोद बनकर, ज्योती म्हस्के आणि प्रकाश खंदारे यांनी अर्जासोबत पक्षाचा ‘ए’ व ‘बी’ फॉर्म जोडलेला नव्हता. त्यामुळे त्यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रिता मेत्रेवार यांनी दिली. ४भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे संजय केणेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र तेथेही त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. त्यांचा अर्ज आज छाननीत बाद झाला तसेच विजय यमाजी खंडागळे (अपक्ष), जियाउद्दीन खाजा (अपक्ष), सय्यद सलीम रशीद (अपक्ष), साजिद खान हमीद खान (अपक्ष), तकी हसन खान (अपक्ष), फय्याज खान कबीर खान (अपक्ष), महेंद्र कचरू सोनवणे (बसपा) यांचेही अर्ज बाद झाले.औरंगाबाद मध्य मतदारसंघात सहा उमेदवारांचे तेरा अर्ज बाद झाले. संजय कांबळे, सचिन निकम, रोहित बनकर, नितीन डेरे, कुंजबिहारी अग्रवाल, युसूफ शेख यांचे अर्ज बाद झाले. आता या मतदारसंघात ४४ उमेदवारांचे अर्ज कायम राहिले आहेत.
८४ उमेदवारी अर्ज बाद
By admin | Published: September 30, 2014 1:23 AM