औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळांतर्गत ११ जिल्ह्यांतील ४ लाख ६२ हजार ८९ विद्युत ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल ८५ कोटी ४१ लाख रुपयांचे वीज बिल आॅनलाईनच्या माध्यमातून भरणा केले आहे.आॅनलाईन वीज बिल भरणा करण्यासाठी वीज ग्राहकांना प्रोत्साहित करण्यात येत असून, यासाठी ०.२५ टक्के सूट दिली जाते. ग्राहकांना वीज बिल पाहणे आणि ते आॅनलाईन भरणा करण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट-डेबिट कार्डसह मोबाईल वॅलेट आणि कॅश कार्ड व इतरही अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यावर वीज बिल भरल्याच्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. महावितरण कंपनीकडून आॅनलाईन वीज बिल भरणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.वीज ग्राहकांना कधीही आणि कोठूनही वीज बिल भरण्याची आॅनलाईन सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीज जोडण्यांचेही बिल भरण्याची सेवा उपलब्ध आहे. ज्यामुळे रांगेत उभे राहण्याची गरज नाही तसेच बिल मिळाले नाही, याची चिंताही यामुळे मिटली आहे. मोबाईल अॅपवरून वीज बिलाचा भरणा सहज करता येतो. वीज बिल भरणा केंद्राच्या रांगेत थांबण्यापेक्षा घरबसल्या अगदी इंटरनेट, मोबाईलसह इतर अनेक सुविधांद्वारे वीज बिल भरणा करणारांची संख्या झपाट्याने वाढत आहे.चौकट...परिमंडळ कार्यालय ग्राहक संख्या रक्कम (कोटी)औरंगाबाद १,२६,०१७ २८.४६जळगाव १,६६,०२७ ३०.१५लातूर १,०५,०३८ १५.६८नांदेड ६५,००७ ११.१२एकूण ४,६२,०८९ ८५.४१
८५ कोटी रुपयांचा आॅनलाईन वीज बिल भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:48 PM
महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळांतर्गत ११ जिल्ह्यांतील ४ लाख ६२ हजार ८९ विद्युत ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल ८५ कोटी ४१ लाख रुपयांचे वीज बिल आॅनलाईनच्या माध्यमातून भरणा केले आहे.
ठळक मुद्देमहावितरण : औरंगाबाद प्रादेशिक विभागातील ११ जिल्हे