जालना : महाराष्ट्र विधान परिषद $ि$िशक्षक मतदार संघ निवडणुकीतील मराठवाडा शिक्षक मतदार संघात जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. ४ हजार ६६६ पैकी ३ हजार ९८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, त्याची टक्केवारी ८५.४९ टक्के आहेत. महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात १२ मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळपासूनच या निवडणुकीसाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद पाहावयास मिळाला. अनेक केंद्रांवर मतदानासाठी रांगा दिसून आल्या. दुपारी १२ वाजपर्यंत ३१ टक्के मतदान झाले होते. तर चार वाजेपर्यंत ७६ टक्के मतदान झाले होते. शेवटच्या एका तासात १० टक्के मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील केंद्रनिहाय झालेले मतदार सरस्वती भवन हायस्कूल (पूर्व) येथे १०८८ पैकी ८८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरस्वती भवन हायस्कूल (प.) येथे १८३ मतदारांपैकी १६१, जिल्हा परिषद हायस्कुल, नेर १२६ मतदारांपैकी १२०, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रामनगर १६६ मतदारांपैकी १४२, जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर २९५ मतदारांपैकी २५८, जिल्हा परिषद हायस्कूल, भोकरदन ७८९ मतदारांपैकी ६७५, जिल्हा परिषद हायस्कूल, जाफ्राबाद ४३० मतदारांपैकी ३७५, जिल्हा परिषद हायस्कूल, अंबड ४१६ मतदारांपैकी ३६५ जिल्हा परिषद हायस्कूल, वडीगोद्री ७३ मतदारांपैकी ६९, जिल्हा परिषद हायस्कूल, कुंभार पिंपळगाव ४३४ मतदारांपैकी ३६९, जिल्हा परिषद हायस्कूल, परतूर ३८७ मतदारांपैकी ३३३ तर जिल्हा परिषद हायस्कुल, मंठा येथे २७९ मतदारांपैकी २४० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.या निवडणुकीसाठी एकूण ४ हजार ६६६ मतदारांपैकी ३ हजार ४३२ पुरुष मतदारांनी तर ५५७ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदानाची टक्केवारी ८५.४० इतकी आहे.या निवडणुकीत राजकीय पक्षांसह अपक्ष मिळून २० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून, त्यांचे राजकीय भवितव्य शुक्रवारी मतदान यंत्रात बंद झाले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ८५ टक्के मतदान
By admin | Published: February 04, 2017 12:49 AM