शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
3
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
4
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
5
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
6
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
7
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
8
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
9
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
10
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
11
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
12
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
13
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
14
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
15
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
Bhai Dooj 2024: बहिणीला ओवाळणीत काय भेटवस्तू द्यावी याचा विचार करताय? हे वाचाच!
17
'पाडव्याला नवऱ्याने स्तुती केल्यावर...'; अविनाश-ऐश्वर्या नारकर यांचा नवीन रील व्हिडीओ चर्चेत
18
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
19
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
20
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी

इंदूरच्या सफाईसाठी ८५०० स्वच्छता मजूर अन् छत्रपती संभाजीनगर येथे जेमतेम २८८६ 

By मुजीब देवणीकर | Published: July 05, 2023 7:20 PM

इंदूर देशात सर्वात स्वच्छ; नेमके रहस्य काय? छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाहणी पथकाने सादर केला अहवाल

छत्रपती संभाजीनगर : स्वच्छतेच्या बाबतीत मागील सहा वर्षांपासून सातत्याने इंदूर शहर देशात पहिल्या क्रमांकावर येत आहे. अखेर या यशाचे नेमके रहस्य तरी काय? हे जाणून घेण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेतील ३० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक इंदूरला जाऊन आले. त्यांनी नगर निगमचे (महापालिका) कामकाज बारकाईने बघितले. ‘पीपीटी’च्या माध्यमाने प्रशासक जी. श्रीकांत यांना अहवाल सादर करण्यात आला. आपल्या शहरालाही इंदूरपेक्षा सुंदर करण्याचे शिवधनुष्य सध्या प्रशासनाने उचलले असून, त्यासंदर्भातील हा विशेष वृत्तांत.

(१) ८,५०० सफाई कर्मचारी- ३२ लाख लोकसंख्येचे इंदूर शहर स्वच्छ करण्यासाठी ८,५०० कर्मचारी आहेत. ५७५ कर्मचारी घंटागाडीवर, १,५०० सफाई मित्र, सात हजार कर्मचारी झाडण्याचे काम करतात.- छत्रपती संभाजीनगरात फक्त २,८८६ कर्मचारी आहेत. त्यातील १,१३६ कर्मचारी कचरा संकलन करणाऱ्या रेड्डी कंपनीचे, मनपाचे १,७५० आहेत. ३०० घंटागाड्या, मोठी वाहने ३९ आहेत.

(२) कचरा वर्गीकरण- इंदूर मनपा ओला व सुका कचरा शंभर टक्के वर्गीकरण करूनच स्वीकारते. घंटागाडीमागे सॅनिटरी नॅपकिन, डायपर, मेडिकल वेस्टसाठी स्वतंत्र व्यवस्था.- छत्रपती संभाजीनगर मनपा ६० टक्के वर्गीकरण करून कचरा जमा करते. संकलन केंद्रावर एकत्र पाठविते. घंटागाडीत अधिकच्या सुविधा नाहीत.

(३) होम कम्पोस्टिंग पद्धत- इंदूरमध्ये काही नागरिक आपला कचरा घरातच कंपोस्ट करतात. मोठ्या वसाहतींमधील कचरा बाहेर येत नाही. स्वत:ची कंपोस्ट युनिट तयार केली आहेत.- आपल्याकडे स्वत:च्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे बोटावर मोजण्याएवढेच नागरिक आहेत. सोसायट्यांमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सोय नाही.

(४) खराब मांसाहार संकलन- इंदूर मनपा खासगी एजन्सीच्या माध्यमाने शहरातील खराब मांसाहार, त्याचे पदार्थ संकलन करते. हे खाद्य प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना देण्यात येते. उर्वरित खाद्यावर प्रक्रिया होते.- छत्रपती संभाजीनगर महापालिका अशा पद्धतीचा कोणताही उपक्रम राबवीत नाही. व्यावसायिकांनी फेकलेल्या मांसाहारावर मोकाट श्वान ताव मारतात.

(५) अत्याधुनिक मशिनद्वारे सफाई- इंदूरला यूएसए, नेदरलँड, फ्रान्स, स्वीडन येथील अत्याधुनिक ३०० वाहनांद्वारे रस्त्यांची सफाई रात्री केली जाते.- आपल्या मनपाने कोट्यवधी खर्च करून देशी बनावटीची सहा वाहने घेतली. ही वाहने चालतात कमी आणि बिघडतात जास्त.

(६) ई-वेस्टसाठी स्वतंत्र प्लँट- इंदूरने सॅनिटरी नॅपकिन, डायपर, घरगुती हानिकारक कचरा, ई-वेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र प्लँट उभारले आहेत.- आपल्या मनपाने अशा पद्धतीचे प्रकल्प उभारण्यासंदर्भात अद्याप विचारही सुरू केलेला नाही.

(७) सार्वजनिक शौचालये- इंदूरला कम्युनिटी टॉयलेट ८५, पब्लिक टॉयलेट २२८, युरिनल १४७ ठिकाणी आहेत.- आपल्याकडे पाच कम्युनिटी टॉयलेट, २१ पब्लिक टॉयलेट, ५० स्वतंत्र युरिनल बंद पडले.

(८) ॲपमध्ये ३११ सेवा- इंदूर मनपाने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून तब्बल ३११ सेवा देण्यात येतात.- आपल्या मनपाचे ॲप अजून तयार झाले नाही. विविध योजनांचे एकच ॲप असणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न