शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
5
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
6
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
7
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
8
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
9
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
10
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
11
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
12
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
13
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
14
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
15
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
16
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
17
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
18
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
19
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका

पोलिस भरती प्रक्रियेत ८८ उमेदवार अपात्र

By admin | Published: June 06, 2014 11:27 PM

हिंगोली : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलिस शिपायांच्या ६७ जागांसाठी ६ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

हिंगोली : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलिस शिपायांच्या ६७ जागांसाठी ६ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ६५० पुरूष उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ४७६ उमेदवार हजर झाल्याने त्यांची कागदपत्रे पडताळणी करून उंची- छातीचे मोजमाप घेण्यात आले. या प्रक्रियेत पहिल्या दिवशी ८८ उमेदवार अपात्र ठरले आहेत.येथील संत नामदेव कवायत मैदानावर पोलिस भरती प्रक्रियेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने सकाळी लवकरच ही प्रक्रिया घेण्यात येत आहे. पहिल्या दिवशी ६५० उमेदवारांना सकाळी ६ वाजता मैदानावर हजर राहण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यापैकी ४७६ जण मैदानावर पोहोचले. पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी- कर्मचाऱ्यांनी भरती प्रक्रियेला सुरूवात केली. या प्रक्रियेसाठी गृहपोलीस उपअधीक्षक रामराव हाके, हिंगोली शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मोरे, वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्यासह पोलिस निरीक्षक शंकर सिटीकर, शिंदे, रावसाहेब भापकर, लक्ष्मण केंद्रे, लक्ष्मण फुलझळके, नानासाहेब नागदरे, दिलीप थोंबळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजमोहन जाधव, अशोक जाधव, आडे यांच्यासह २०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना ओळखपत्र देण्यात आले असून भरती प्रक्रियेच्या कामादरम्यान कोणत्याही अधिकारी- कर्मचाऱ्यांना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.पहिल्या दिवशीची प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये उंची-छाती मोजमाप तसेच कागदपत्र पडताळणीमध्ये ८८ उमेदवारांना भरतीसाठी अपात्र ठरविण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी दिली. त्यांना चेस्ट क्रमांक देण्यात आले असून शारीरिक चाचणीसाठी ११ जूनपासून बोलावण्यात येणार आहे. दरम्यान, ७ व ८ जून रोजी दोन्ही दिवशी प्रत्येकी ६५० उमेदवारांना बोलावण्यात आले आहे. ९ जून रोजी महिला उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी येण्याबाबत कळविण्यात आले आहे. ६ ते ८ जून दरम्यान ज्या उमेदवारांना आवेदनपत्र भरूनही प्रवेशपत्र मिळाले नाही किंवा इतर कारणास्तव ते प्रक्रियेसाठी हजर राहू शकले नाही, अशा उमेदवारांना १० जून रोजी आणखी एक संधी देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)