- विकास राऊत
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून मराठवाड्यात ९१ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणुकीच्या प्रचारातील राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि राजकीय गदारोळात जगाच्या पोशिंद्याचा सर्वांना विसर पडल्याचे दिसत आहे. मराठवाडा विभागातील भीषण दुष्काळ, २०१२ पासून आजवर नापिकीचा होत असलेला सामना आणि सावकारी पाशात अडकलेले शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.शेतकºयांचे जीवनमान उंचावण्याची त्यासाठी कर्जमाफीपासून ते पेन्शन देण्यापर्यंत राजकीय पक्ष आश्वासने देत असताना प्रचारादरम्यान शेतकºयांच्या आत्महत्यांसंदर्भात राजकीय पक्ष चकार शब्द बोलायला तयार नाहीत, असे चित्र आहे.
१ जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत २२० शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. १४८ शेतकºयांना सरकारी मदत दिली असून, ५४ प्रकरणे अपात्र आहेत. १८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. १ ते ३१ मार्चपर्यंत ६९ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, मागील पंधरवड्यात सुमारे २२ शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.
औरंगाबादमध्ये २५, जालन्यातील २१, परभणीती १७, हिंगोलीत १२, नांदेडमध्ये २९, बीडमधील ५२, लातूरमधील २५, उस्मानाबादमधील ३९ शेतकºयांनी आजवर आत्महत्या केली आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत शेतकºयांनी आत्महत्या केल्याचा आकडा मोठा आहे.महिना आत्महत्याजानेवारी ६२फेबु्रवारी ६७मार्च ६९एप्रिल २२एकूण २२०रणधुमाळीत शेतक-यांचा विसरकै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले की, राजकीय रणधुमाळीत शेतकºयांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. मुळ मुद्यांपासून राजकारण भरकटले आहे. शेतकºयांची आत्महत्या, त्यांच्या आर्थिक प्रश्नांना बगल दिली जात आहे. जाती-धर्म आणि एकमेकांवर आरोप करणारी भाषणे निवडणुकीच्या रणधुमाळीत होत आहेत. प्रचाराचा पहिला आणि दुसरा टप्पा संपला तरीही शेतकºयांच्या धोरणांवर उपायात्मक चर्चा होत नाहीत. शेतक-यांची क्रयशक्ती संपली असून पर्यावरण, पाणी-चाराटंचाईमुळे ते हताश आहेत. धोरण, नियोजन करण्याऐवजी दोषारोप करणारे राजकारण सुरू आहे. राजकारण्यांची ९८ टक्के भाषणे एकमेकांवर आरोप करणारी आहेत.रोजच पुलवामा होत आहेराज्यात दिवसाकाठी ४३ शेतकरी आत्महत्या करीत असल्यामुळे येथे रोजच पुलवामा होतो आहे. काँग्रेसने शेतकरीविरोधात केलेले कायदे भाजपने रद्द केले नाहीत. ते दोन्ही पक्ष शेतकरी आत्महत्यांना जबाबदार आहेत. शेतकºयांचे मारेकरी हेच पक्ष आहेत, म्हणून ते तोंड लपवीत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीतदेखील ते शेतकºयांविषयी बोलत नाहीत, असा आरोप शेतकरी पुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केला.