शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

बनावट स्वाक्षऱ्या करून बहिणीच्या घरावर उचलले ९३ लाखांचे कर्ज; लहान बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 4:06 PM

६० वर्षीय मोठ्या बहिणीचे घर बँकेकडे तारण ठेवून त्यांच्या परस्पर ९२ लाख ९५ हजार ६७३ रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्या लहान बहिणीविरोधात वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्देदोघी बहिणींनी १९९९ साली एमआयडीसीकडून ४ हजार ७०० चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला होता. यापैकी तक्रारदार यांच्या नावे २ हजार ३५० चौरस फूट जागा आहे.

औरंगाबाद : ६० वर्षीय मोठ्या बहिणीचे घर बँकेकडे तारण ठेवून त्यांच्या परस्पर ९२ लाख ९५ हजार ६७३ रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्या लहान बहिणीविरोधात वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले करीत आहेत.जयश्री नवनाथ सोमासे (४५, रा. बजाजनगर) असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. 

अधिक माहिती देताना वेदांतनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार आशाबाई चंद्रभान निमसे (६०, रा. कासलीवाल तारांगण, मिटमिटा) आणि आरोपी जयश्री या दोघी बहिणी आहेत. तक्रारदार यांच्या पतीचे बारा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. दोघी बहिणींनी १९९९ साली एमआयडीसीकडून ४ हजार ७०० चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला होता. यापैकी तक्रारदार यांच्या नावे २ हजार ३५० चौरस फूट जागा आहे. या भूखंडावर तक्रारदार यांनी एमआयडीसीकडून परवानगी घेऊन दोन घरे बांधलेली आहेत. 

१० जानेवारी २००६ रोजी त्यांच्या घराचे स्वतंत्र खरेदीखतही केलेले आहे. ३ सप्टेंबर २०१७ रोजी तक्रारदार अदालत रोडवरील देना बँकेत गेल्या असता त्यांच्या घरावर कर्ज असल्याचे बँक व्यवस्थापक सिन्हा यांनी त्यांना सांगितले होते. नंतर त्यांनी या कर्जाविषयी अधिक चौकशी आणि खात्री केली असता, त्यांचीच लहान बहीण जयश्री सोमासे यांनीच तिच्या आणि तक्रारदार यांच्या भूखंडावर ९२ लाख ९५ हजार ६७३ रुपये कर्ज घेतल्याचे समजले. विशेष म्हणजे हे कर्ज घेताना जयश्री यांनी तक्रारदार यांची परवानगी घेतली नाही. एवढचे नव्हे तर तत्कालीन बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यांनी या कर्जासाठी जामीनदार म्हणून कागदपत्रावर खोटी सही केली. 

जाब विचारताच दिली जिवे मारण्याची धमकीजयश्री यांनीच परस्पर आपल्या घरावर कर्ज घेतल्याचे समजताच आशाबाई यांनी त्यांना याविषयी जाब विचारण्यासाठी गेल्या. तेव्हा जयश्री यांनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे आशाबार्इंनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. लहान बहिणीनेच आपली फसवणूक केल्याचे समजताच आशाबाईने त्यांच्याविरोधात थेट उस्मानपुरा पोलीस ठाण्यात २३ मे रोजी तक्रार दाखल केली. जयश्री यांनी परस्पर आणि बनावट सही करून आपल्या घरावर कर्ज उचलून फसवणूक केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले करीत आहेत.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसfraudधोकेबाजीFamilyपरिवार