शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

९६ लाख २२ हजारांची वसुली रखडली

By admin | Published: July 19, 2015 12:44 AM

लातूर : महाराष्ट्र शासनाने ग्रामपातळीवर कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी लातूर जिल्ह्यातील ६८ गावात जलस्वराज पाणीपुरवठा योजना राबविली होती़

 

लातूर : महाराष्ट्र शासनाने ग्रामपातळीवर कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी लातूर जिल्ह्यातील ६८ गावात जलस्वराज पाणीपुरवठा योजना राबविली होती़ या योजनेत गाव समितीच्या अध्यक्ष, सचिवांनी कामे न करताच निधी उचलला़ परिणामी, १ कोटी ३६ लाख ८ हजार २७० रुपयाची वसुली मोहीम प्रशासनाने सुरु केली आहे़ शिवाय, अध्यक्ष, सचिव असलेल्या ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ४१ लाख ६२ हजार ४७७ रुपयांचा बोजा त्यांच्या सातबाऱ्यावर लावण्यात आला आहे़ ५९ गावांतील अध्यक्ष सचिवांना ९६ लाख २२ हजार १४३ रुपयांच्या वसुलीबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या़ मात्र वसुली नसल्याचे समोर आले आहे़ लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु़) ६२ हजार १५४, धनेगाव ६० हजार १६२, करकट्टा ११ हजार ४९५, औसा तालुक्यातील एकंबी १ लाख ७० हजार ६०७, शिवणी (बु़) १ लाख ३५ हजार ४९८, वाघोली ५३ हजार ५४५, हसाळा २१ हजार ३५५, भंगेवाडी ५३ हजार ३७६, बिरवली १ लाख १४ हजार ३९२, निलंगा तालुक्यातील बुजरूगवाडी १ लाख ७८ हजार ५० रूपये, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी (घु़) ९१ हजार ३९२, भिंगोली २ लाख ९२ हजार ८२ रूपये, हालकी ३ लाख १६ हजार ४१७ रूपये, आनंदवाडी १ लाख ३० हजार ५९६, वेबनाळ १ लाख १४ हजार ५५४ रूपये, लक्कड जवळगा १ लाख ६२ हजार २१३, अंकुलगा (स़) २० हजार ४०० रूपये, दैठणा ८४ हजार ७९० रूपये.जळकोट तालुक्यातील मेवापूर ९५ हजार ११९, जगळपूर ६१ हजार ४२०, विराळ ९४ हजार १४२, लाळी (खु़) १ लाख ४९ हजार ३२८, गुत्ती ४३ हजार ९०८, गुत्तीतांडा ९ हजार ६४, गव्हाण ४५ हजार ९५१, जिरगा १ लाख ७२ हजार ५१०, हावरगा-डोमगाव ७ लाख ९४ हजार ७५६, उदगीर तालुक्यातील शंभू उमरगा ११ लाख ७० हजार ७०३, अवलकोंडा २ लाख १० हजार ७८७, गंगापुर १ लाख १५१, चौंडी २२ हजार ९९६, नागलगाव (ता़) ५ लाख ७३ हजार ५४६, बनशेळकी १ लाख ४९ हजार ४३१, आडोळवाडी ३ हजार ३५२, इस्लामपूर १५ हजार ७७१़ अहमदपूर तालुक्यातील परचंडा ४ लाख ५७ हजार ३०१, तळेगाव १ लाख ७० हजार ७३१ व्यस्तापूर १ लाख ७२ हजार ९५३, तांबटसांगवी ९४ हजार ६८४, नागझरी ३ लाख ७५ हजार ९४़ चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ ४ लाख ८ हजार ६०८, घारोळा १ लाख ३२ हजार ८४, महाळंग्रा १ लाख ७२ हजार ७५३़ रेणापूर तालुक्यातील वांगदरी १ लाख ५८ हजार ५४, पोहरेगाव २ लाख ५७ हजार ९२७, सारोळा ७२ हजार २०४, सय्यदपूर २५ हजार ६०६, हारवाडी ३ लाख ९ हजार ४८८ व पळशी अशा एकूण ९६ लाख २२ हजार ७९३ रुपयाची वसुली होणे बाकी आहे़ (प्रतिनिधी)जलस्वराज आंतर्गत शासनाने दिलेला कोट्यावधीचा निधी खर्चुनही या गावामध्ये परिपूर्णपणे पाणीपुरवठा यशस्वी झालेला नाही़ परिणामी या गावात जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे़ जलस्वराज्याची कामे झालेल्या गावात पुन्हा पाणीपुरवठ्याची कामे नाहीत, असे आदेश असतानाही टंचाईमुळे टँकर देण्यात आले आहे़