जालना : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत १४५४ वीज ग्राहकांकडून वीज बिलाची ४३ लाख ६ हजार रूपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. तर अनेक वेळा सूचना, नोटिसा बजावूनही दाद न देणाऱ्या ९७ वीज ग्राहकांचा १६ लाख ५१ हजारांच्या थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करून मीटर व वायर जप्त करण्यात आले.विजेचा वापर करूनही बिले न भरणाऱ्या १०१४ ग्राहकांचा ६४ लाख ५६ हजार रूपयांच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज बिल वसुली मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. वीज बिलाचा भरणा केल्याशिवाय कोणाचाही वीजपुरवठा जोडण्यात येणार नाही. थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित केल्यास महावितरणच्या परस्पर कोणी वीज पुरवठा जोडून घेतल्यास संबंधितांवर वीज कायदा २००३ नुसार कडक दंडात्मक कारवाई करण्याचे संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत. वीज बिलासंबंधी काही तक्रार किंवा शंका असल्यास संबंधितांनी जवळच्या महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक अभियंता कैलास हुमणे यांनी केले. थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची कटु कारवाई टाळावी. चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. तसेच जालना जिल्हयातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या २४२ जोडण्यांचा ५ कोटी ७६ लाख ४८ हजार रूपये थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तर १८ वीज जोडण्यांकडून ९ लाख ५२ हजार रूपये वसूल करण्यात आले.
९७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
By admin | Published: March 31, 2017 12:14 AM