शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

मराठवाड्यातील ९ लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; सरकार कधी निर्णय घेणार?

By विकास राऊत | Published: January 25, 2024 1:31 PM

विभागीय आयुक्तालयाने शासनाला निधी मागणीचा प्रस्ताव दिला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरसह विभागातील आठ जिल्ह्यांतील ४ लाख ९४ हजार ९१८.३० हेक्टरवरील कापसासह रबी पिके, फळबागांना गेल्या महिन्यातील अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे ९ लाख ६७ हजार ५६१ शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांना ७०९ कोटी ९२ लाख ४१ हजार रुपयांचा मदतनिधी लागणार आहे.

विभागीय आयुक्तालयाने शासनाला निधी मागणीचा प्रस्ताव दिला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले, तर गेल्या हंगामात दीड महिना पावसाचा खंड राहिल्याने खरीप हातून गेले. पुढे रब्बी हंगामात २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ दरम्यान विभागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील ४ लाख ७६ हजार ७७८.९८ हेक्टर जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान अवकाळी पावसाने केले. ४ हजार २१८.७५ हेक्टरवरील बागायत क्षेत्राला, तसेच १३ हजार ९२०.५७ हेक्टवरील फळपिकांना फटका बसला.

जिल्हानिहाय बाधित शेतकरी व अपेक्षित निधीजिल्हा............ बाधित शेतकरी संख्या..... एकूण बाधित क्षेत्र......अपेक्षित निधीछत्रपती संभाजीनगर ..... २६४१९४             ...... १४८३६८.४१             ...... २०६००.५८जालना             ....... २०७२१६             ...... १२३०९१.८७             ....... १९१७६.९३परभणी             ....... २३१७८७             ....... ९५०५३.६७             ....... १३०८०.५९हिंगोली             ...... २५७६२५             ....... १२३१६४.४०             ...... १६७८६.६५नांदेड             ..... ३९२२             ...... ३७५८.५०             ....... ८८०.२६लातूर                        ..... ८८८             ......२६२.८९             ...... ३५.९१बीड                         ...... १७                         ...... ९.९०             ...... २.१९धाराशिव             ...... १९१२             ..... १२०८. ६६             ....... ४२९.३०एकूण             ..... ९६७५६१             ..... ४९४९१८.३०            ....... ७०९९२.४१

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद