शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

नियोजन समितीच्या चार जागांसाठी ९८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:08 AM

जिल्हा नियोजन समितीच्या नगरपालिका गटातील चार जागांसाठी शुक्रवारी ९८ टक्के मतदान झाले. शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपालिका गटातील चार जागांसाठी शुक्रवारी ९८ टक्के मतदान झाले. शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी होणार आहे.परभणी जिल्हा नियोजन समितीच्या २४ सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडणुकीत जिल्हा परिषद गटातील २० जागा आणि महानगरपालिका गटातील ४ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. नगरपालिका गटातील ४ जागांसाठी मतदान घ्यावे लागले. ४ जागांसाठी ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्ग गटातील एका जागेसाठी पूर्णा येथील राकाँच्या नगरसेविका शमीम बेगम शेख चाँद बागवान आणि गंगाखेड येथील भाजपचे नगरसेवक शेख कलीम शेख रहिमोद्दीन, सर्वसाधारण स्त्री गटातून राष्टÑवादी काँग्रेसच्या जिंतूर येथील नगराध्यक्षा सबिया बेगम कपिल फारुकी, काँग्रेसच्या पठाण मैमुनिस्सा फैज खान, पूर्णा येथील राकाँचे नगरसेवक शमीम बेगम मोहम्मद शरीफ आणि मानवत येथील काँग्रेसच्या नगरसेविका शैलजा उमेशराव बारहाते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सर्वसाधारण जागेसाठी शिवसेनेचे पूर्णा येथील उपनगराध्यक्ष विशाल कदम आणि राकाँचे पाथरी येथील गटनेते जुनेद खान दुर्राणी असे ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथील तहसील कार्यालयात सकाळी ८ वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. एकूण १५४ सदस्यांपैकी १५१ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ७६ पुरुष आणि ७५ महिला मतदारांनी मदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या निमित्ताने जिल्हाभरातील नगरसेवकांनी परभणीत गर्दी केली होती. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सकाळी मतमोजणी होणार आहे.