ज्ञानेश्वर हरिदास टाले असे प्रामाणिक तरुणाचे नाव असून क्रांती चौक ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. जी.एच. दराडे यांनी त्याचा सत्कार केला. पोलिसांनी सांगितले की, ज्ञानेश्वर हा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी समर्थनगरातील मराठा वसतिगृहात राहतो. २० रोजी वसतिगृह परिसराची स्वच्छता करीत असताना कॅरिबॅगमध्ये त्याला ५०० रुपयांची दोन बंडले सापडली. या बंडलात एकूण ९८ हजार ५०० रुपये असल्याचे आढळून आल्यावर या पैशाचा मोह न बाळगता त्याने वॉर्डनकडे जमा केले. चार दिवस त्यांनी पैशावर दावा सांगणारा कोणी येतो का, याची प्रतीक्षा केली. मात्र, कोणीही पुढे न आल्याने आज त्यांनी ही रक्कम क्रांती चौक पोलिसांकडे जमा केली. पोलीस निरीक्षक दराडे, अमोल देवकर, उपनिरीक्षक माधव गायकवाड, संजय बनकर यांनी ज्ञानेश्वरचे कौतुक केले.
प्रामाणिक तरुणाने सापडलेले ९८ हजार ५०० रुपये केले पोलिसांत जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:04 AM