शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

छत्रपती संभाजीनगरकरांनी एक सवय बदलली अन् गुरुवारच्या भिकाऱ्यांच्या फेरीला ब्रेक लागला

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 21, 2024 6:43 PM

ट्रेनने मंगळवारी जालना, बुधवारी बदनापूर, गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात येतात भिकारी

छत्रपती संभाजीनगर : कोणत्या शहरात कोणत्या दिवशी भीक मागायला जायचे हे भिकाऱ्यांच्या पूर्वजांनी ठरवून ठेवले होते. मराठवाड्याच्या राजधानीत दर गुरुवारी रेल्वेने शेकडो भिकारी येतात व दुकाना-दुकानात भीक मागत संपूर्ण शहर पिंजून काढतात. ही परंपरा आता खंडित होताना दिसत आहे. होय, व्यापाऱ्यांनी नाणी देण्याऐवजी अन्नपदार्थ देणे सुरू केले आणि भिकाऱ्यांनी शहराकडे पाठ फिरविली.

मंगळवारी जालना, बुधवारी बदनापूर, गुरुवारी शहरातभीक मागणारे एकाच गावात जास्त वेळ थांबत नाहीत. रेल्वेने प्रवास करीत जोडल्या गेलेल्या वेगवेगळ्या गावात जाऊन ते भीक मागत असतात. जालना शहरात मंगळवारी, बुधवारी बदनापुरात भीक मागतात तर गुरुवारचा दिवस खास छत्रपती संभाजीनगरसाठी राखीव ठेवलेला आहे. गुरुवारी दिवसभर भीक मागून हे भिकारी सायंकाळाच्या रेल्वेने निघून जातात.

भीक मागण्यासाठी शहरभर पांगतात भिकारीगुरुवारी सकाळी रेल्वेने शेकडो भिकारी रेल्वेस्टेशनवर येतात. येथून पीरबाजारात सर्वजण जमा होतात. थोडा वेळ चहा-पाणी केल्यावर सर्व भिकारी शहराच्या विविध भागात पांगले जातात. दुकाना-दुकानांमध्ये जाऊन भीक मागतात. पूर्वी पैठण गेट ते शहागंज या भागातच भिकारी भीक मागत फिरत होते, पण शहराचा विस्तार वाढल्यामुळे अनेक भिकारी सिडको-हडको, पुंडलिकनगर, गारखेडा या परिसरातही गुरुवारी दिसत आहेत.

नाण्याचा व्यवहारप्रत्येक दुकानदार गुरुवारीसाठी १ रुपयाचे १५० ते २०० नाणी बाजूला काढून ठेवतात. भिकारी आला की, त्याला वाटीत ठेवलेले १ रुपयाचे नाणे दिले जाते. असे एक-एक रुपया मिळून दिवसभरात प्रत्येक ३०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा होत. मध्यंतरी नाण्यांची टंचाई होती, तेव्हा या भिकाऱ्यांना १० ते १५ रुपये कमिशन देऊन दुकानदार त्यांच्याकडून नाणी विकत घेत होते. याद्वारे मोठ्या प्रमाणात सुट्टे पैशांची उलाढाल होते.

आता नाण्यांंऐवजी अन्नपदार्थअनेक दुकानदारांनी आता सुट्टे पैशांऐवजी भिकाऱ्यांना अन्नपदार्थ देणे सुरू केले आहे. कोणी नाष्टा तर कोणी जेवण देतात तर कोणी बिस्किटचा पुडा तर कोणी चॉकलेट, कोणी राजगीराचे लाडू, तर काही व्यापाऱ्यांनी भिकाऱ्यांना केळी देणे सुरू केले. शहरभर फिरल्यानंतर रोख रक्कम हातात मिळणे कमी झाल्याने भिकाऱ्यांनी आता गुरुवारी शहरात येणे कमी करून टाकले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBeggerभिकारी