शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

मराठवाड्यात टँकरचे शतक; हिवाळ्यातच पाणीटंचाईची चाहूल

By विकास राऊत | Published: November 10, 2023 5:32 PM

सध्या १२० हून अधिक टँकरद्वारे पाणीटंचाई असलेल्या गावे, वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सध्या १२० टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून आगामी काळात ही संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. हिवाळ्यातच पाणीटंचाईची चाहूल लागली असून गुरुवारी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मराठा आरक्षण पुरावे शोध मोहीम, पीकविमा, पाणीटंचाई, महसुली वसुलीच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली.

आयुक्त आर्दड म्हणाले, मराठा आरक्षण पुरावे शोध मोहिमेसह विभागातील पाणी व चाराटंचाईचा आढावा घेतला. सध्या १२० हून अधिक टँकरद्वारे पाणीटंचाई असलेल्या गावे, वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची कमतरता लक्षात घेता भविष्यात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जनावरांना मुबलक चारा उपलब्ध असावा, टंचाई भासू नये, यासाठी चारा लागवड करा, गाळपेरा यावर प्राधान्य द्या. महाबीजकडून चारा बियाणे घ्यावे. यासाठी डीपीसीतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. तसेच, विभागातील पोलिस ठाणे, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत की नाही यावर बैठकीत चर्चा झाली. कॅमेरे नादुरुस्त असतील तर ते सुरू करण्याबाबत बैठकीत आदेश देण्यात आले. बैठकीस जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

विमा कंपन्याचे आक्षेप फेटाळलेछत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोलीसह लातूर या चार जिल्ह्यांतील संबंधित पीक विमा कंपनीने सादर केलेले आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने देण्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत. विभागात यंदाच्या पावसाळ्यात १५ टक्के तूट राहिली आहे. विभागातील सूमारे २४५ हून अधिक मंडळांत सलग २१ किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचा खंड पडल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता या बाबीखाली संबंधित शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश दिले आहेत.-मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई