शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

चिनी ड्रॅगनने सिंहासोबत महिषासूर मर्दिनीजवळ पटकावली जागा, भक्तांमध्ये ठरतोय चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 8:04 PM

विशेष म्हणजे या मूर्ती चीनमधील मूर्तिकारांनी नव्हे, तर स्थानिक मूर्तिकाराने तयार केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : दुर्गा देवीलाच महिषासूर मर्दिनी म्हटले जाते. महिषासूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी देवीने रौद्ररूप धारण केले होते. सिंहारूढ देवीने राक्षसाला आपल्या पायदळीत तुडवत त्याच्या छातीवर त्रिशूलाने घाव केला. अशा रूपातील महिषासूर मर्दिनीच्या मूर्तीची नवरात्रोत्सवात पूजा केली जाते. मात्र, यंदा देवीच्या मूर्तीत चिनी ड्रॅगनने शिरकावा केला आहे. सिंहासोबतच ड्रॅगनवरही देवी बसली आहे. अशी मूर्ती भक्तांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

चिनी ड्रॅगन शुभ की अशुभचार पाय असलेला सापांसारखा अक्राळविक्राळ दिसणारा तोंडातून आग ओकणाऱ्या चिनी ड्रॅगनचे भयानक चित्र आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे त्याची छबी दुष्ट व घातक प्राण्यासारखी आहे. मात्र, चीन देशात या प्राण्याला पारंपारिक, शक्तिशाली आणि शुभ शक्तीचे प्रतिक मानले जाते. मात्र, देवीचे वाहन सिंह असतानाही मूर्तिकाराने ड्रॅगनचा वापर केला आहे. विशेष म्हणजे या मूर्ती चीनमधील मूर्तिकारांनी नव्हे, तर स्थानिक मूर्तिकाराने तयार केली आहे. हीच प्रथा पडेल आणि नवीन पिढीला हा चिनी ड्रॅगनच देवीचे वाहन आहे, हेच खरे वाटायला लागेल, अशी भीती भाविक व्यक्त करत आहेत.

मध्य प्रदेशातील धर्तीवर देवीच्या मूर्तीयंदा मूर्तिकारांनी मध्य प्रदेशातील धर्तीवर देवीच्या मूर्ती बनविल्या आहेत. देवीच्या चेहऱ्याची मांडणी थोडी वेगळी आहे. ओरिजनल ब्लाऊज व साडी नेसवलेली आहे. काथ्यापासून तयार केलेली सिंहाच्या आयाळ या रूपातील मूर्ती नाविण्यपूर्ण ठरत आहे.

संगमरवरी दिसणारी वाॅटरप्रुफ मूर्तीदुर्गा देवीची संगमरवरी मूर्ती बाजारात दाखल झाली आहे. लांबून बघितल्यावर ही देवी संगमरवरी वाटते, पण प्रत्यक्षात प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आहे. त्यावर रंग असा दिला की, ती संगमरवरी वाटते. विशेष म्हणजे तो रंग वाटरप्रुफ आहे.

सिंहासनावर विराजमान देवीची मूर्ती यंदाचे आकर्षणयंदा सिंहासनारूढ दुर्गा देवीची मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत आहे. त्यातही दोन-तीन नवीन डिझाइन बघण्यास मिळत आहेत, तसेच गणपती बाप्पा जसे सिंहासनावर गोलाकार उशी पाठीमागे घेऊन बसतो. त्या प्रमाणे बसलेली देवीची मूर्ती लक्षवेधी ठरत आहे.

साडेतीन शक्तिपीठाच्या मूर्तीमहाराष्ट्रात आदिमाया शक्तीचे साडेतीन शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरगडावरील रेणुका माता व वणी (नाशिक) येथील सप्तश्रृंगी मातेच्या मूर्तीही विक्रीला आल्या आहेत.

१ ते ८ फुटांपर्यंतच्या मूर्तीबाजारात १ फूट ते ८ फुटांपर्यंतच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. यात २२०० ते ३४ हजारांच्या मूर्तीचा समावेश आहे. लहान-मोठ्या ३५०० मूर्ती शहरात विक्री होतील. अमावस्येआधीच मूर्ती बुकिंगला सुरुवात झाली आहे.- बी.एस. जवळेकर, मूर्तिकार.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNavratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४