शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

पालखी सोहळ्याच्या एक दिवस आधी मानाचा घोडा चोरीस गेल्याने खळबळ, पैठण येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 5:24 PM

शुक्रवारी पालखी सोहळ्यात घोडा सामील होणार आहे, एक दिवस आधीच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. 

- अनिलकुमार मेहेत्रे

पाचोड( छत्रपती संभाजीनगर) : पैठण सरकारी दवाखान्यासमोर बांधलेला पालखी सोहळ्यातील मानाचा घोडा चोरट्यांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. पैठण पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेमुळे हा घोडा पाचोडजवळ वडजी गावात आढळून आल्यानंतर गावकऱ्यांनी हा घोडा पैठण पोलिसांच्या ताब्यात गुरुवारी सकाळी नऊ वाजता दिला. आता उद्या, शुक्रवारी पालखी सोहळ्यात घोडा सामील होणार आहे, एक दिवस आधीच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. 

पैठण येथून शुक्रवारी संत एकनाथ पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे. या पालखी सोहळ्यामध्ये महेश राजेंद्र सोनवणे यांचा मानाचा घोडा सामील होतो. पैठणच्या सरकारी दवाखान्यासमोर बांधलेला हा घोडा बुधवारी रात्री चोरीस गेला. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास महेश सोनवणे हे घोड्याला वैरणपाणी करण्यासाठी गेले असता घोडा जागेवर दिसला नाही. आजूबाजूला शोध घेतला असता घोडा दिसला नाही. त्यामुळे सोनवणे यांनी लागलीच पैठण पोलीस स्टेशन गाठले. 

पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी शोध मोहीम सुरू करत सोशल मिडियातून घोड्याचे फोटो व्हायरल केले. दरम्यान, पाचोडजवळ वडजी गावातील आबा गोजरे महेश झरकर किशोर गोजरे रवी भांड यांना  घोडा दिसून आला. गाव परिसरात चोरटा लहान मुलांना घोड्यावरून चक्कर मारण्यासाठी दहा रुपये घेत होता.

पैठण येथीलच घोडा असल्याचे स्पष्ट होताच तरुणांनी पोलीस पाटील विठ्ठल झिने यांना माहिती दिली. त्यानंतर पैठण पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय देशमुख पथकासह सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वडजी गावात दाखल झाले. मात्र, पोलिस आल्याची कुणकुण लागताच चोरटा घोडा तिथेच सोडून फरार झाला. गावकऱ्यांनी घोड्याला पकडून पैठण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा मानाचा घोडा उद्या, शुक्रवारी संत एकनाथ पालखी सोहळ्यामध्ये सामील होणार आहे. एक दिवस आधी घोड्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी वेगवान तपास केल्याने घोडा वेळीच आढळून आल्याने मोठी नामुष्की टळलली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAshadhi Ekadashiआषाढी एकादशीCrime Newsगुन्हेगारी