औरंगाबाद : इंस्टाग्रमावर ओळख झालेल्या विवाहितेचा पाठलाग करीत तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्यास, असे म्हणतन अश्लिल वर्तन करणाऱ्या तरुणाच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मयूर भागवत धनावडे (रा. जयभवानीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका विवाहितेची इंस्टाग्रामवर मयुर सोबत ओळख झाली होती. या ओळखीतून तो विवाहितेचा सतत पाठलाग करीत होता. विवाहितेचे आरोपीस बोलण्याची इच्छा नसतानाही त्याने पाठलाग सुरुच ठेवला. २५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एन ५ सिडकोतील गुलमोहर कॉलनी येथे आरोपीने विवाहितेकडे जाऊन म्हणाला, तू माझ्याशी का बोलत नाही, मी तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्या, असे म्हणत विवाहितेला स्वत:जवळ ओढुन घेत अश्लिल वर्तन केले.
तेव्हा विवाहितेने आरोपीला विरोध केला असता, त्याने शिविगाळ केली. तसेच तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुला व तुझा पती, मुलगा आणि आई वडिलांना जीवे मारीन अशीही धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास सिडको पोलीस करीत आहेत.