छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास येथील हरिहर सद्गुरू शक्तीपीठ रेणुका माता मंदिराचा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे. येथे तीन मजली भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. संपूर्ण मंदिर कर्नाटकी शैलीतील आहे. आता फक्त रंगरंगोटी राहिली आहे. भाविकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे फेब्रुवारी २०२५ या महिन्यात रेणुका मातेची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
सुमारे ४ फुटाचा देवीचा नवीन तांदळासद्गुरू आप्पा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची निर्मिती अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. मंदिरातील गाभारा मोठा आहे. त्यानुसार रेणुका मातेचा सुमारे ४ फुटाचा नवीन तांदळा तयार करण्यात येणार आहे. खुद्द महाराज हा तांदळा तयार करणार आहेत. त्याची प्राणप्रतिष्ठा फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे. हे मंदिर छत्रपती संभाजीनगरचे आध्यात्मिक वैभव ठरणार आहे, अशी माहिती अंबरीश महाराज व अनिरुद्ध महाराज यांनी दिली.
वैशिष्ट्ये :३००० चौ. फुटांचे ध्यान मंदिर३००० चौ. फुटांचे सभामंडप.३ हजार चौ. फुटांचे सत्संग, धार्मिक कार्यक्रमासाठी बैठक व्यवस्था
भविष्यातील उद्दिष्ट :अभिनव गुरुपीठवेद पाठशाळायज्ञशाळागौ-शाळाअन्नछत्रमोफत संस्कार वर्गसामूहिक उपासना