शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

सत्तारांच्या सिल्लोडमध्ये दानवेंच्या विरोधात निघणार मोर्चा, देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 7:26 PM

अब्दुल सत्तार -रावसाहेब दानवे यांच्या मैत्रीत मिठाचा खडा; सिल्लोड शहर बंदची हाक; दानवे विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हे दाखल करन्यासाठी निघणार निषेध मोर्चा

सिल्लोड: भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अजिंठा येथील आंदोलनात सिल्लोडपाकिस्तान आहे की काय ? जनतेने रहावे की जावे ? असा सवाल करून येथील जनतेचा अपमान केला आहे. सिल्लोडचा वारंवार पाकिस्तान, असा उल्लेख केल्याने दानवेंच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करत गुरुवारी शहर बंदची हाक देत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे अब्दुल सत्ताररावसाहेब दानवे यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे.

गुरुवारी दुपारी ११ वाजता सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून तहसील कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर उपजिल्हाधिकारी, व पोलीस अधीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकी पूर्वी सिल्लोड शहर व तालुक्यातील वातावरण तापले आहे. एकेकाळी पक्के मित्र असलेले  रावसाहेब दानवे व अब्दुल सत्तार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. शिवना येथे गणेश महासंघाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील लावण्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी बंद पाडल्या. यामुळे तब्बल ३९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याच्या निषेधार्थ रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता गुरुवारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी दानवे यांच्या विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. यामुळे सत्तार- दानवेंचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतांना दिसत आहेत. राज्यात युतीत सोबत असलेले भाजप - शिवसेना यांचे सिल्लोड मतदार संघात खटके उडतांना दिसत आहे. 

या मोर्चामध्ये सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन अर्जुन पाटील गाढे, केशवराव तायडे, श्रीराम महाजन, प्रभाकर काळे, मारुती वराडे,मुरलीधर काळे, राजूबाबा काळे, दामूअण्णा गव्हाणे, रामदास पालोदकर, नंदकिशोर सहारे, विश्वास दाभाडे, सतीष ताठे, सय्यद नासेर हुसेन, संदीप राऊत, गणेश सपकाळ यांनी केले आहे.या मोरच्यात मोठे शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारraosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना