शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
4
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
5
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
6
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
8
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
9
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
10
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
11
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
12
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
13
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
14
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
15
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
16
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
17
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
18
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
19
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
20
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या

महामार्गावर वाहतूक रोखून ‘अर्थ’पूर्ण चौकशी; पोलिसच साधताहेत ‘समृद्धी’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 2:00 PM

गाड्या महामार्गावर मधोमध थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे वेगात येणाऱ्या इतर गाड्याही त्या ठिकाणी थांबल्या होत्या.

- शेख मुनीरछत्रपती संभाजीनगर : वेगवान वाहतुकीच्या मोहाने अनेकांच्या जिवावर उठलेला बाळासाहेब ठाकरे महामार्ग आता वाहतूक पोलिसांच्या ‘समृद्धी’त भर घालतो आहे. सुसाट वाहने महामार्गावर अचानक मध्यभागी थांबवून वाहतूक पोलिस त्यांची ‘अर्थ’पूर्ण चौकशी करीत असल्याने एक नवेच संकट वाहनचालकांवर आल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग अनेक कारणांनी चर्चेत आहे. वेगवान वाहनांच्या सतत होणाऱ्या अपघातामुळे समृद्धी महामार्ग प्रत्येकाच्या तोंडोतोंडी झालेला आहे. या संकटातून वाचणारे वाहनचालक आता वाहतूक पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकत आहेत. महामार्गावर अचानक कुणालाही वाहने थांबविता येत नाहीत; परंतु जटवाडा परिसरात वाहतूक पोलिसांनी समृद्धीवरून जाणाऱ्या अवजड वाहनांना रोखून त्यांची झाडाझडती घेणे सुरू केले आहे. चौकशीचा ‘अर्थ’ ध्यानात घेऊन वाहनचालक वाहतूक पोलिसांना पाहून अगोदरच सावध होत आहेत. ट्रकचालकाशी सौहार्दाची बोलणी झाल्यावरच त्यांना पुढे जाऊ दिले जाते. या भागात एकाच वेळी शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या चार अवजड वाहतुकीच्या गाड्या रविवारी भरदुपारी थांबविण्यात आल्या होत्या. या गाड्यांमधील चालकांकडून गाडीच्या कागदपत्रांची तपासणी केली. वाहतूक पोलिसांशी बोलणी करून पुढे निघालेल्या एका ट्रकचालकाशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्याने चौकशीचे इंगित सांगितले. विशेष म्हणजे थांबविलेल्या या गाड्या महामार्गावर मधोमध थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे वेगात येणाऱ्या इतर गाड्याही त्या ठिकाणी थांबल्या होत्या. या रस्त्यावर कोठेही थांबण्यास मनाई आहे.

कागदपत्रांत क्षुल्लक त्रुटी आढळल्याने गाडी सोडण्यासाठी प्रत्येकी २०० रुपये द्यावे लागले.- संबंधित वाहनचालक.

‘समृद्धी’वर वाहने उभी करू नये : आरटीओसमृद्धी महामार्गावर पार्किंग करता येत नाही. पेट्रोल पंपावर दिलेल्या जागेतच वाहने उभी केली पाहिजेत. रस्त्यावर वाहन उभे केल्यास ‘नो पार्किंग’ची कारवाई केली जाते. तसेच नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या वाहनांचे फोटो काढून कारवाई केली जाते, अशी माहिती आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी आरटीओ कार्यालयाने विविध उपाययोजना सुरूरु केल्या आहेत. यासाठी रात्रंदिवस दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. या महामार्गावर धोकादायक पद्धतीने वाहनांची पार्किंग करणाऱ्यांवरही आरटीओ कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांत तब्बल १ हजार ४०१ वाहनचालकांवर ‘नो पार्किंग’ची कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीस