शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

तिकडे मिशन इलेक्शन, इकडे पाण्यासाठी वणवण; मराठवाड्यातील नागरिकांची तहान टँकरवर

By विकास राऊत | Updated: April 18, 2024 15:24 IST

एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच मराठवाड्याचा ‘टँकर’वाडा होऊ लागला आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि तापमानाचा पारा जोरात आहे. राजकारण्यांचे मिशन इलेक्शन सुरू आहे, तर मतदारांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. विभागातील ३६ तालुक्यांतील ८१३ गावे आणि २६४ वाड्यांतील सुमारे १० लाख मतदारांची तहान सध्या ११९४ टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.

एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच मराठवाड्याचा ‘टँकर’वाडा होऊ लागला आहे. सहा जिल्ह्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला असून, एप्रिल अखेर आणि मे महिन्यांत टंचाईची काय परिस्थिती असेल, यावर विभागीय प्रशासन आढावा घेत आहे. निवडणुकीचे नियोजन आणि टंचाईच्या उपाययोजनांची प्रक्रिया प्रशासकीय यंत्रणेला सोबतच करावी लागणार आहे.

गावाची लोकसंख्या १ हजारच्या आसपास, तर वाडीवरील लोकसंख्या ५०० असे गृहीत धरल्यास मराठवाड्यातील १० लाख लोकसंख्या सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून असून, येणाऱ्या काळात हे चित्र आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.

राजधानी तहानली...मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ५२७ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यातील ३४५ गावे आणि ५१ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यात सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू आहेत. त्याखालोखाल जालना जिल्ह्यात ३५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २३० गावे आणि ६१ वाड्या टँकरच्या पाण्यावर अवंलबून आहेत. बीड जिल्ह्यात २२६ टँकरने १८५ गावे आणि १४८ वाड्यांना पाणी दिले जात आहे. धाराशिव जिल्ह्यात ७२ टँकरने ४३ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. परभणीत २, लातूरमध्ये ८ व नांदेडमध्ये ५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

किती तालुक्यांत टंचाईमराठवाड्यातील ७६ पैकी ३६ तालुक्यांतील ग्रामीण भाग सध्या टंचाईच्या विळख्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ८ तालुके, जालन्यातील ८, परभणीतील १, नांदेडमधील २, बीडमधील ८, लातूरमधील २, तर धाराशिव जिल्ह्यातील ७ तालुक्यांना टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेतविभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना टंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.- मधुकरराजे अर्दड, विभागीय आयुक्त

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीMarathwadaमराठवाडा