शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

याची देही याची डोळा! कैलास लेण्याची अद्वितीयता डोंगरावरून अनुभवता येणार,रस्त्याचे काम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 1:26 PM

वर्षभरात रस्त्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दिली आहे

औरंगाबाद : वेरूळ येथील कैलास लेणी ही अद्वितीय वास्तू आहे. कैलास लेणी वरच्या बाजूने पाहिल्यावर पर्यटकांना ते अद्वितीय व भव्य असल्याची अनुभूती होईल. त्यासाठी डोंगरावर एक रस्ता करण्याचा प्रस्ताव भारतीय पुरातत्व सर्वेक्षणकडऊन (एएसआय) तयार करण्यात आला असून, वर्षभरात हा रस्ता तयार होईल, असे एएसआयचे अधीक्षक डाॅ. मिलन कुमार चावले यांनी सांगितले.

आफ्रिका, तामिळनाडू आणि वेरूळ अशा जगभरात तीनच ठिकाणी कैलास लेणीसारखे एका दगडातील शिल्पाचे कोरीव काम झाले आहे. त्यापैकी कैलास हे सर्वात मोठे आहे. कळसापासून पायापर्यंत कोरीव शिल्प आहे. हे डोंगरावरून पाहिल्यावर हे जागतिक वारसा स्थळ का आहे, ते लक्षात येते. हे विहंगम दृश्य पर्यटकांना पाहता यावे यासाठी वरच्या बाजूने बघण्यासाठी सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्या एक पाऊलवाट आहे. मात्र ती फारशी सुरक्षित नसून पर्यटकांनीही फारशी त्याबद्दल माहिती नाही. तिथे रस्ता करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या महाव्यवस्थापकांनी नुकतीच वेरूळ लेणीची पाहणी केली. हा त्यांचा धावता दौरा होता. यावेळी येथील प्रस्तावित कामांवर चर्चा झाली असून, ती कामे पुढील वर्षभरात मार्गी लागतील, असे चावले यांनी सांगितले.

पर्यटकांसाठी महाराष्ट्रदिनी ई-बसवेरूळ लेणीतील बॅटरीवर चालणाऱ्या बसेस १४ मार्चपासून सुरू होणार होत्या. मात्र, अजूनही या बसच्या तपासणीचे काम सुरू आहे. १ मेपासून या बस सुरू होण्याची शक्यता आहे. हे सर्व वेंडरवर अवलंबून असून, लेणी परिसरात चढउतार अधिक असल्याने बसची क्षमता व बॅटरीच्या चाचण्या त्यांच्याकडून सुरू आहेत, असे एएसआयचे अधीक्षक डाॅ. चावले यांनी यांनी सांगितले.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन