शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

कारागृहातून कुख्यात गुंड चालवतो अमली पदार्थांचे सिंडिकेट; आई, बहिणी अन् मेहुण्याची मदत

By राम शिनगारे | Published: July 31, 2024 8:17 PM

‘एनडीपीएस’ पथकाच्या कारवाईत पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगर : एमपीडीए कायद्यांतर्गत हर्सूल कारागृहातून कुख्यात गुंड सय्यद फैसल ऊर्फ तेजा आई, बहीण आणि मेहुण्याच्या मदतीने अमली पदार्थांच्या विक्रीचे सिंडिकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या एनडीपीएस पथकाने छापा मारत हा प्रकार उघडकीस आणला. त्याशिवाय तेजाच्या आईकडून महागड्या औषधांच्या ४१ बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.

आरोपींमध्ये रेश्मा अंजुम सय्यद एजाज (४५, रा. किलेअर्क), तिचा मुलगा सय्यद फैसल ऊर्फ तेजा, जावई आदनान शेख बब्बू शेख ऊर्फ सोनू मनसे, मुलगी नबीला अंजुम सय्यद एजाज आणि एजंट मोबीन कुरेशी ऊर्फ मोबीन कचरा (रा. पैठण गेटजवळ) समावेश आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्थापन केलेल्या एनडीपीएस पथकाच्या प्रमुख वरिष्ठ निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकास अमली पदार्थांची किलेअर्क परिसरात विक्री होत असल्याचे समजले. बागवडे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार महेश उगले, सतीश जाधव, संदीप धर्मे, विजय त्रिभुवन, छाया लांडगे आणि औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांनी छापा मारला.

रेश्मा पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिला महिला अंमलदाराने पाठलाग करून पकडले. तिच्या घराची झडती घेतल्यानंतर अवैध विक्रीसाठी ठेवलेल्या ४१ बाटल्या सापडल्या. पोलिसांना तिने सांगितले की, नशेसाठी गोळ्या, औषधी विक्रीचा व्यवसाय कारागृहात असलेला मुलगा चालवतो. त्याचे अनेक एजंट असून, कारागृहात भेटायला गेल्यानंतर त्याने हे सर्व समजून सांगितले. त्यानंतर एजंट मोबीन कचरा हा औषधीचा पुरवठा करतो. जावई सोनू औषधी घरी आणतो आणि मुलगी नबीला व रेश्मा औषधीची विक्री करतात, अशी कबुली आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

१५० ची औषधी ५०० रुपयांनारेश्मा एजंटामार्फत १७५ रुपये किंमत असलेली औषधी १५० रुपयांमध्ये खरेदी करीत होती. तीच औषधी ५०० रुपयांना विकत होती. दररोज १०० पेक्षा अधिक बाटल्यांची विक्री होत असे. मात्र, आरोपी औषधीच्या साठ्याची माहिती देत नाहीत.

तेजावर १२ गुन्हेअमली पदार्थांची हर्सूल कारागृहातून विक्री करणारा सय्यद फैसल ऊर्फ तेजा हा कुख्यात गुंड आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याच्या विराेधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात १२ वर गुन्ह्यांची नोंद आहे. एजंट मोबीन कचरा हाही रेकॉर्डवरील आरोपी आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थAurangabadऔरंगाबाद