छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जुन्या दस्तऐवजांच्या आधारे एक वर्षाहून अधिक कालावधी झालेल्या जन्म व मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यावर शासन स्थापित एसआयटीच्या एका पत्राद्वारे स्थगिती देण्यात आली आहे.
तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावरून जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याचे अधिकार वर्ग करण्यात आलेले आहेत. परंतु सध्या बांगलादेशी वास्तव्यावरून राज्यभर गदारोळ सुरू झाल्याने प्रमाणपत्र देण्याबाबत स्थगितीचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या राजपत्राद्वारे जन्म-मृत्यू नोंदणी कायदा १९६९ मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म-मृत्यू नोंदणीचे अधिकार जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रदान केले. उशिरा दिलेल्या प्रमाणपत्राबाबत शासनाकडे तक्रारी वाढल्याने त्याची चौकशी करण्यासाठी गृह विभागाने विशेष तपासणी पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. त्यामुळे उशिराने देण्यात येणारे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यास पुढील आदेशापर्यंत स्थगिती द्यावी, असे २१ जानेवारी रोजी शासनाने विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सिल्लाेड आघाडीवरप्रमाणपत्र देण्यात सिल्लोड तालुका आघाडीवर आहे. २८४५ प्रमाणपत्र सिल्लोडमध्ये दिले आहेत. या प्रमाणपत्रावरच आधारकार्ड, रेशन कार्डच्या सुविधा मिळतात. सिल्लोडसह सहा तालुक्यांनी एकही प्रस्ताव फेटाळलेला नाही.
१९३४ चा जन्मदाखला मागितलाकन्नड तालुक्यात एकाने १९३४ साली जन्म झाल्याचा दाखला मिळावा, यासाठी प्रशासनाकडे अर्ज केला आहे. यासाठी लागणारे पुरावे, कागदपत्रांची छाननी करून ते प्रकरण निकाली काढण्यात येणार आहे. परंतु आता असे प्रमाणपत्र देण्याबाबत स्थगिती असल्यामुळे हे प्रकरण बाजूला राहिले, असे सूत्रांनी सांगितले.
फक्त ८८ प्रकरणे फेटाळली१० हजार ६८ पैकी ५ हजार ७१४ उशिरा आलेल्या अर्जांआधारे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. त्यात फक्त ८८ अर्ज फेटाळले आहेत. ४ हजार २६६ अर्ज प्रलंबित आहेत.
तहसीलनिहाय आलेले अर्जतालुका...............................किती प्रमाणपत्र दिलेछत्रपती संभाजीनगर...............१५१८सिल्लोड...........................२८४५सोयगाव.............................४१कन्नड.............................३१३खुलताबाद......................१९१गंगापूर...........................३२६वैजापूर.........................२९८पैठण..........................१०६फुलंब्री.........................७६एकूण........................५७१४