शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

गाजलेल्या वसतिगृह शुल्कवाढीवर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेरविचार

By राम शिनगारे | Published: July 08, 2024 11:48 AM

एसएफआयच्या आंदोलनामुळे शुल्कवाढीचा विषय पुन्हा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत आला आहे

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठातील सर्वच वसतिगृहांच्या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यावरून विद्यार्थी संघटनांसह अधिसभा सदस्यांमध्ये प्रचंड रोष होता. या रोषाचा सामना विद्यापीठ प्रशासनाला करावा लागला. एसएफआय संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले. तेव्हा प्रशासनाने वसतिगृहांच्या शुल्कवाढीचा विषय पुन्हा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, सोमवारी (दि.८) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीकडे सर्व संघटनांसह विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विद्यापीठाच्या १० एप्रिल २०२४ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत वसतिगृहांचे वार्षिक शुल्क २ हजार ६५ रुपयांवरून थेट ३ हजार २०० रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. त्याशिवाय अनामत रक्कम २०० रुपयांवरून ५०० रुपये केली होती. ऐन दुष्काळाच्या काळातच वसतिगृह विकास समितीच्या शिफारशींनुसार ही शुल्कवाढ करण्यात आली होती. या ठरावास कोणत्याही व्यवस्थापन परिषद सदस्याने विरोध दर्शविला नव्हता. सर्वानुमते निर्णय मंजूर केला होता. मात्र, निर्णय घेतल्यापासून त्यास विद्यार्थी संघटनांसह अधिसभा सदस्यांनी विरोध दर्शविला आहे. एसएफआय विद्यार्थी संघटनेने वसतिगृहांची शुल्कवाढ रद्द करण्यासह कमवा व शिका योजनेचे मानधन वाढविण्यासाठी २० जूनपासून प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. या उपोषणाकडे सुरुवातील प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. मात्र, अधिसभा सदस्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये चर्चेनंतर तोडगा निघाला होता. प्रशासनाने वसतिगृहांची शुल्कवाढ आणि कमवा व शिका योजनेत मानधन वाढविण्याचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यास होकार दर्शविला होता. त्यानुसार सोमवारी होणाऱ्या बैठकीत हा विषय चर्चेला येणार आहे. त्याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एसएफआय संघटनेचे धरणे आंदोलनएसएफआय विद्यार्थी संघटनेतर्फे प्रशासकीय इमारतीसमोर सोमवारी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. वसतिगृहांची शुल्कवाढ रद्द करणे, कमवा व शिका योजनेचे मानधन ४ हजार करणे, सेट, नेट, एम. फील झालेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.ला प्रवेश देणे, पेट परीक्षेत सर्व विषयांना जागा उपलब्ध करून देणे आणि यूजीचे पीएच.डी. मार्गदर्शक कायम ठेवण्यात येऊन सर्व संशोधकांना मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या मागण्या संघटनेने केल्या आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद