शहरं
Join us  
Trending Stories
1
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
3
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
4
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
5
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
6
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
7
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
9
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
10
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
12
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
13
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
14
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
15
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
16
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
17
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
19
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
20
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

कोट्यवधीचा टॅक्स भरणारा ‘व्यापारी कधी लाडका’ होणार; व्यापाऱ्यांनी काढला जाहीरनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 7:44 PM

जनतेचा जाहीरनामा: राज्यात स्वतंत्र व्यापार मंत्रालय स्थापन करावे ; जीएसटी आला मग राज्यातील ‘व्यवसाय कर’ हटवा

छत्रपती संभाजीनगर : ग्राहकांकडून टॅक्स घेऊन तो सरकारच्या तिजोरीत भरतात. सरकार व ग्राहक यांच्यातील दूताचे काम व्यापारी वर्ग करीत असतो. देशात सर्वाधिक बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देणारे ‘व्यापार क्षेत्र’च आहे. मात्र, हा व्यापारी वर्ग नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. कोणत्याही सरकारच्या काळात ‘लाडका व्यापारी’ झालाच नाही. विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा राज्यात झाली आहे. निवडून येणाऱ्या सरकारने राज्यात ‘स्वतंत्र व्यापार मंत्रालय’ स्थापन करावे. तसेच राज्यातील ‘व्यवसाय कर’ कायमस्वरुपी हटविण्यात यावा, असा जाहीरनामा व्यापारी संघटनांनी तयार केला आहे.

स्वतंत्र व्यापार मंत्रालय हवेदेशात सर्वात जास्त प्रमाणावर रोजगार निर्मिती लहान-मोठे व्यापारी बांधवांकडून होते. याकरिता उद्योग मंत्रालयाप्रमाणे एक राष्ट्रीय व्यापार निती आयोगाची स्थापना करावी व महाराष्ट्र राज्यात ‘स्वतंत्र व्यापार मंत्रालय’ स्थापन करण्यात यावे. यामुळे व्यापार क्षेत्रातील अडीअडचणी सोडवण्यास मदत होईल.-आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स

जीएसटी आहे व्यवसायकर रद्द कराजीएसटी ही करप्रणाली देशात लागू होऊन आता वर्ष पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने ‘ एक देश एक करप्रणाली’ अशी घोषणा केली होती. मात्र, अजूनही महाराष्ट्र राज्यात ‘व्यवसाय कर’ वसूल केला जात आहे. व्यापाऱ्यांच्या जाहीरनाम्यात हा कळीचा मुद्दा आम्ही घेतला आहे. व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे की, राज्यातील व्यवसाय कर रद्द करण्यात यावा.-लक्ष्मीनारायण राठी, वरिष्ठ उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

औषधाची विक्री करणाऱ्या ई-कॉमर्सवर निर्बंध आणाऔषध विक्रेते सर्व सरकारी नियमाचे पालन करून जबाबदारीने औषध रुग्णांना विकत असतात. औषध व अन्न प्रशासनाचे असंख्य निर्बंध औषध विक्रेत्यांवर आहेत. मात्र, ऑनलाइन औषध विक्रीतून अनेक गैरप्रकार होत आहेत. त्यावर शासनाचे निर्बंध नाही. ई-कॉमर्सद्वारे जुनी, बनावट, दूषित किंवा मान्यता नसलेल्या औषधांची विक्रीचा धोका आहे. राज्य सरकारने ऑनलाईन औषध विक्रीवर कायमस्वरुपी बंदी आणावी. ही मागील अनेक वर्षांची मागणी आहे.-नितीन देशमुख (दांडगे), अध्यक्ष, डिस्टीक केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

अवाजवी वीज दरवाढ रद्द करावीसर्व व्यापार-उद्योगांचा प्राण म्हणजे ‘वीज’ आहे. वीजपुरवठा असेल तर व्यवसाय, उत्पादन सुरळीत होत असते. उद्योजक असो वा व्यापारी नियमितपणे वीज बील भरत असतात. मात्र, महावितरण दरवर्षी ‘विजे’चे दर वाढवित आहेत. देशात सर्वात महाग वीज महाराष्ट्रात विकत घेतली जाते. महावितरणाने दर ५ वर्षाने वीज बिलात वाढ करावी. व्यापाऱ्यांना सवलतीच्या दरात वीज मिळावी. त्यासाठी राज्य सरकारने कायदा करावा.-संतोष कावले-पाटील, अध्यक्ष, कॅट, स्थानिक शाखा

राज्य शासनाकडे मागणी१) उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ज्येष्ठ व्यापाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी.२) व्यापाऱ्यांचा सुरक्षा विमा काढण्यात यावा.३) व्यापाऱ्यांना कमी व्याजदरात बँकेकडून कर्ज उपलब्ध करून द्यावे.४) एक देश एक कर यानुसार जीएसटी लागू झाला. आता व्यवसाय कर रद्द करावा.५) माळीवाडा येथे ‘सी अँड एफ’ हब सुरू करावे.६) करोडी शिवारात मालवाहतूक नगर उभारण्यात यावे.७) व्यावसायिकांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून द्यावी.

७ लाख व्यापारी जिल्ह्यात६० हजार व्यापारी शहरात

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर