शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

भाजपच्या अतुल सावे यांच्या रोमहर्षक हॅट्ट्रिकची 'ही' आहेत कारणे; 'MIM'ची तिसऱ्यांदा हार

By विकास राऊत | Published: November 24, 2024 11:58 AM

औरंगाबाद पूर्व मतदारसंघ; २१६१ मतांनी विजय केला साकार; इम्तियाज जलील, लहू शेवाळे, गफ्फार कादरी यांचा पराभव

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अतुल सावे यांची २४व्या फेरीअखेर रोमहर्षक हॅट्ट्रिक झाली. २३ व्या फेरीपर्यंत अतिशय काटे की टक्कर अशी लढत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी सावे यांना दिली. २१६१ मतांनी सावे यांनी गड राखला. ९२ हजार ४७१ ईव्हीएमवर, तर ८०३ पोस्टल मतांसह सावे यांना ९३ हजार २८४ मते मिळाली, तर जलील यांना ९० हजार ६९४ ईव्हीएमवर, तर ४१९ पोस्टल मतांसह ९१ हजार ११३ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार लहू शेवाळे यांना १२ हजार ५६८ मतांवर समाधान मानावे लागले. वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांनी ६५०७ व समाजवादी पार्टीचे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांनी घेतलेल्या ५९४३ मतांसह अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या मतांनी पूर्व मतदारसंघाच्या निकालाची उत्कंठता प्रत्येक फेरीला वाढविली.

जालना रोडवरील एसएफएस शाळेतील केंद्रात सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. निवडणूक अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार रमेश मुंदलोड यांच्या टीमने साडेआठ तास परिश्रम घेत १५३४ पोस्टल आणि २ लाख १६ हजार ५८० ईव्हीएमची मते मोजली. मतमोजणीच्या एकूण २४ फेऱ्या होत्या.

जिल्ह्यात सर्वाधिक २९ उमेदवार या मतदारसंघात होते. त्यातील १६ उमेदवार मुस्लिम होते. मत विभाजनाचे गणित शेवटच्या टप्प्यावर जुळल्यामुळे सावे यांचा २१६१ मतांनी निसटता विजय झाला. २०१४, २०१९ च्या तुलनेत सावे यांना सर्वांत कमी मतांनी विजय मिळाला, तर एमआयएमची या मतदारसंघात पराभवाची हॅट्ट्रिक झाली.

मिळालेली मते: ९३ हजार २७४

सावे यांच्या विजयाची तीन कारणे- मराठेत्तर मतदारांनी सावे यांची विजयाची वाट सुकर केली.- मुस्लिम उमेदवारांमध्ये मत विभागणी झाल्यामुळे फायदा.- विजयासाठी साम, दाम, दंड, भेदाची नीती वापरावी लागली.

जलील यांच्या पराभवाची तीन कारणे- मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.- मराठा व इतर मतदान मिळाले, परंतु गेमचेंजर झाले नाही.- दलित मतदारांचा विश्वास जिंकता न आल्याने फटका बसला.

मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेली मतेउमेदवाराचे नाव... ......पक्ष...................मिळालेली मतेअतुल सावे...................भाजप ................९३२७४इम्तियाज जलील..........एमआयएम.............९१११३लहू शेवाळे.................काँग्रेस.............१२५६८शीतल बनसोडे............बसपा................१२३३अफसर खान...........वंचित बहुजन आघाडी.........६५०७अब्दुल गफ्फार कादरी.....समाजवादी पार्टी......५९४३इसा यासीन....... एआयएमएआयएएम...........५६७जयप्रकार घोरपडे ....... पीडब्ल्यूपीआय.........१५५योगेश सुरडकर ..........लोकराज्य पार्टी.........१५७रविकिरण पगारे .......व्हीसीके...........५७राहुल साबळे ........... एएसपी (कांशीराम)........३६९साहेबखान यासीनखान ........ बीआरएसपी..........११३शकिला नाजेखान पठाण .......अपक्ष.................१४२तसनीम बानो .......... अपक्ष................६१दैवशाली झिने .......... अपक्ष...........१८८नीता भालेराव ........... अपक्ष..........४७२पाशू शेख ............ अपक्ष.............४९५मधुकर त्रिभुवन ........ अपक्ष........१०१मोहम्मद मोहसीन ......... अपक्ष........८२राहुल निकम ......... अपक्ष........९९लतीफ खान ........ अपक्ष...........१३०शमीम शेख .......... अपक्ष...........३१५शहजाद खान ......... अपक्ष........६७२शेख अहमद .........: अपक्ष...........६७सद्दाम अब्दुल अ. शेख ...... अपक्ष.........९९सलीम उस्मान पटेल ........ अपक्ष....८९सोमनाथ वीर ....... अपक्ष........९४संतोष साळवे ......अपक्ष..........६४हनीफ शाह .......... अपक्ष.......६५नोटा...............१२८९

नोटासह ३० उमेदवारपोस्टल मते : १५५०मोजलेली मते : २ लाख १६ हजार ५८०

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वAtul Saveअतुल सावेBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन