शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

छत्रपती संभाजीनगरात १२४ वर्षांपूर्वी पहिल्या सार्वजनिक गणेश मंडळासाठी महिलेचा पुढाकार

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 31, 2023 4:51 PM

कॉंग्रेसचे कार्यकर्ते व माजी नगराध्यक्ष बाबूलाल पराती यांची आई गुलाबबाई पराती यांनी ‘गणेशभक्त भजनी मंडळ’ स्थापन करून पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना १८९९ या वर्षी केली होती.

छत्रपती संभाजीनगर : ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात जनमानस तयार करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्याचीच प्रेरणा घेऊन त्यावेळीच छत्रपती संभाजीनगरात सार्वजनिक गणेश मंडळाची सुरुवात कोणी पुरुषाने नव्हे तर एका महिलेच्या पुढाकाराने झाली. त्या मंडळाची स्थापना राजा बाजारात झाली होती, यास यंदा १२४ वर्षे पूर्ण होत आहेत.

कॉंग्रेसचे कार्यकर्ते व माजी नगराध्यक्ष बाबूलाल पराती यांची आई गुलाबबाई पराती यांनी ‘गणेशभक्त भजनी मंडळ’ स्थापन करून पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना १८९९ या वर्षी केली होती. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरासमोरील भागात पराती यांचे मिठाईचे दुकान होते. याच दुकानात एकाबाजूला गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली. तुपाचे डब्बे आणि त्यावर लाकड्याच्या ५ पायऱ्या रचल्या, वरच्या पायरीवर गणेश मूर्ती आणि खालच्या चार पायऱ्यांवर खेळणी मांडण्यात आल्या होत्या. गुलाबबाई पराती यांचे माहेर पुण्याचे त्यांनी माहेरहून खेळणी आणली होती. हा देखावा बघण्यासाठी त्यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या वाढत गेली, यानंतर १९२४ साली सार्वजनिक गणेश महासंघाची स्थापना झाली. पण, पहिले गणेश मंडळ स्थापन करण्याचा मान गुलाबबाई पराती या महिलेलाच जातो.

टिळकांच्या भाषणाने गुलाबबाई पराती झाल्या होत्या प्रभावितलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९४ मध्ये पुण्यातील विंचूरकर वाड्यात सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. टिळक हे खटल्याच्या निमित्ताने १८९९ छत्रपती संभाजीनगरात आले असताना त्यांचे जाहीर भाषण ऐकण्यासाठी राजा बाजारातील रहिवासी गुलाबबाई पराती या शहागंजात गेल्या होत्या. त्यावेळी टिळकांनी सर्वांना सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन करण्याचे आवाहन केले. त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन गुलाबबाई पराती यांनी गणेशभक्त भजनी मंडळाची स्थापना करून त्यावर्षी आपल्या मिठाईच्या दुकानात सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती बसविला. हे मंडळ शहरातील पहिले गणेश मंडळ ठरले.

टांग्यात आणली होती मूर्तीत्या काळी मछलीखडक रस्त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती विक्री होत असे. गणेशभक्त भजनी मंडळाची पहिली गणपती मूर्ती याच मछली खडकाहून टांग्यातून आणण्यात आली होती. भजनी मंडळाच्या सर्व सदस्यांनी भजन म्हणत मूर्तीला वाजत गाजत राजा बाजारात आणले होते. गणेश भक्त भजनी मंडळाचा गणपती १९७० पर्यंत बसत होता. आता पराती यांच्या घरात गणपती बसविला जात असून गणेशोत्सवात पराती परिवाराचे सर्व सदस्य एकत्र येऊन आरती करीत असतात.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAurangabadऔरंगाबाद