शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

By राम शिनगारे | Published: April 24, 2023 12:16 PM

मृत तरुण हा एमबीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठातील एमबीएच्या द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्राची अंतर्गत चाचणी परीक्षा देण्यासाठी घरातून निघालेल्या युवकाचा कचऱ्याच्या कॉम्पॅक्टर गाडीखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सेंट्रल नाका परिसरातील पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर घडली. या घटनेची नोंद सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

ओमकार लक्ष्मण थोरात (२३, रा. जुना बायजीपुरा) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओमकार हा एमजीएम संस्थेतील एमबीएच्या चौथ्या सत्रात शिक्षण घेत होता. महाविद्यालयात ८ मेपासून अंतिम परीक्षांना सुरुवात होणार होती. त्यापूर्वी अंतर्गत चाचणी परीक्षा सुरू होत्या. चाचणी परीक्षा देण्यासाठी ओमकार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच २० एफसी ३४८०) सेंट्रल नाक्यासमाेरून महाविद्यालयात जात होता. पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन कार्यालयाच्या पुढे गेल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगात कचरा वाहून नेणारा कॉम्पॅक्टर (क्र. एमएच २० ईएल २८५६) येत होता. त्याच्या पुढे ओमकारची दुचाकी होती.

दरम्यान, दुचाकीच्या पुढे असलेल्या एका कारने त्यास हुलकावणी दिल्यामुळे ओमकार रस्त्यावर पडला. दुचाकी बाजूला निसटली. तेवढ्यात मागून भरधाव येणाऱ्या कॉम्पॅक्टरच्या पाठीमागील चारचाकी टायर ओमकारच्या डोक्यावरून गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती समजताच सिडकोचे निरीक्षक संभाजी पवार, ड्यूटी ऑफिसर सपोनि. राजेंद्र बनसोडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. ओमकारला घाटी रुग्णालयात पाठविल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. अधिक तपास उपनिरीक्षक द्वारकादास भालेराव करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू