शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

दुसऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण; सहा महिन्यांतच कुटुंबास दुसरा धक्का

By सुमित डोळे | Published: November 16, 2023 6:19 PM

कुटुंबातील मोठ्या मुलाचा सुसाट कारच्या धडकेत जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : एका दुचाकीचालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात विशाल भास्कर नवगिरे (२८) या तरुणाने स्वत:चे प्राण गमावले. रविवारी सायंकाळी तो मित्रासह जात असताना मागून आलेल्या सुसाट कारच्या धडकेत त्याचा अंत झाला. चिकलठाणा ते केंब्रिज चौक रस्त्यावर हा अपघात घडला.

मुकुंदवाडीत राहणारा विशाल केंब्रिज चौकातील एका आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात सुपरवायझर होता. रविवारी त्याला सुटी होती. दुपारी ४ वाजता मित्र मनोज घुगेसोबत बाहेर जाण्याचे ठरल्यावर दोघे दुचाकीने केंब्रिज चौकाच्या दिशेने गेले. दरम्यान, दिवाळीनिमित्त त्यांनी बुटांची खरेदी केली. खरेदी करून ते दोघेही घराच्या दिशेने निघाले होते. मात्र एका कारने हूल दिल्याने त्याच्याजवळून जाणाऱ्या दुचाकीचालकाचा अपघात घडण्याची शक्यता होती. त्याला वाचवण्यासाठी विशालने दुचाकी बाजूला घेताच दुसऱ्या सुसाट जाणाऱ्या कारने त्याला धडक दिली. यात तो व मनोज लांबपर्यंत फेकले गेले. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी सिडको ठाण्याचे सहायक फौजदार विष्णू मुंढे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोके, छातीला गंभीर दुखापत झाल्याने विशालचा मृत्यू झाला. मनोजवर उपचार सुरू आहेत.

सहा महिन्यांतच कुटुंबाने दुसरा आधार गमावलाविशाल भावंडांमध्ये मोठा होता. त्याच्या कुटुंबात आई, दोन भाऊ, एक बहीण आहे. केंब्रिज चौकातील एका औषधाच्या दुकानात सुपरवायझरची नोकरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. सहा महिन्यांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. सहा महिन्यांतच कुटुंबाने दुसरा आधारदेखील गमावल्याने मित्र, नातेवाइकांना अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद