लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कलर्स वाहिनीच्या ‘तू आशिकी’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकार पंक्ती शर्मा (जन्नत जुबेर रेहमानी), अहान धनराजगीर (रित्विक अरोरा) आणि उदय (रुषल पारख) मंगळवारी सायंकाळी लोकमत लॉन येथे सखींच्या भेटीला आले होते. यावेळी सखींनी एकच जल्लोष करून ‘तू आशिकी..’ या मालिकेची औरंगाबादमध्ये असलेली लोकप्रियता दाखवून दिली.लोकमत सखी मंच आणि कलर्स वाहिनीतर्फे आयोजित सुरेखा पुणेकर यांच्या ‘नटरंगी नार’मध्ये या लोकप्रिय कलाकारांनी उपस्थिती लावली आणि सखींची मने जिंकून घेतली. मराठमोळ्या लावणीचा आविष्कार पाहण्यासाठी पंक्तीनेही खास मराठमोळी वेशभूषा केली होती. नऊवार साडीतली पंक्ती पाहून सखींना अत्यानंद झाला. अहान आणि पंक्ती यांनी ‘तू आशिकी’ मालिकेच्या शीर्षक गीतावर अप्रतिम नृत्य केले.यानंतर सखींना ‘तू आशिकी’ मालिकेची चित्रफीत दाखविण्यात आली आणि त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. अचूक उत्तर देणाºया संगीता हळदे, नीता ललवाणी, सुशीला महेर, शिवगंगा जायभाय या चार भाग्यवान सखींना अहान आणि उदय यांच्याबरोबर नृत्य करण्याची संधी मिळाली. पंक्तीने या नृत्याचे परीक्षण केले. त्यानंतर कलर्सच्या वतीने अहान आणि उदय यांनी चारही सखींना फुले आणि सरप्राईज गिफ्ट दिले. ‘तू आशिकी’ ही मालिका आता अतिशय रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे.स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी पंक्तीने आता अहानसोबत गायन क्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे चिडलेला जेडी अनिताला म्हणजेच पंक्तीच्या आईला तिचे मनगट पिरगळून अत्यंत क्रूरपणे धमकावतो. यापासून अनभिज्ञ असलेल्या पंक्तीला आपल्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, असेच वाटते. आईची काळजी, जेडीचा रोष आणि गायिका म्हणून स्वत:चे करिअर घडविणे, अशा सर्वच आघाड्यांवर पंक्तीचा सध्या संघर्ष सुरू आहे. अहान सर्वतोपरी पंक्तीला सहकार्य करीत आहे आणि जेडी अनिताचा उपयोग करून पंक्ती आणि अहान यांना वेगळे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहे. पुढे काय होणार? पंक्तीचा संघर्ष कुठवर यशस्वी होणार, हे जाणून घेण्यासाठी बघत राहा कलर्स वाहिनीवर दर सोमवार ते शुक्रवार सायं. ७ वा. ‘तू आशिकी...’
मनापासून दादलावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि त्यांच्या साथीदारांनी केलेले सादरीकरण लावणीतील आशिकीची जादू दाखविणारे होते. ‘या रावजी...’, ‘दिलबरा करते तुला मुजरा...’, ‘आला आला गोविंदा आला..’, ‘पिकल्या पानाचा..’ या बहारदार लावण्या सखींना ठेका धरायला भाग पाडत होत्या. शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट करून महिलांनी लावणीला मनापासून दाद दिली.