शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

अबब! १३७ किलो वजनाच्या रुग्णाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:02 AM

हृदय न उघडता केले व्हॉल्व्ह रोपण ‘एमजीएम’च्या डॉक्टरांचे यश : रुग्णाचे चालणे झाले सुसह्य औरंगाबाद : एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय ...

हृदय न उघडता केले व्हॉल्व्ह रोपण

‘एमजीएम’च्या डॉक्टरांचे यश : रुग्णाचे चालणे झाले सुसह्य

औरंगाबाद : एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल १३७ किलो वजन असलेल्या ६० वर्षीय रुग्णाची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी केली. कोणतीही चिरफाड आणि हृदय उघडे न करता अँजिओप्लास्टीप्रमाणे कॅथेटर टाकून हृदयाचे व्हॉल्व्ह रोपण केले आणि रुग्णाला नवीन आयुष्यच दिले.

बुधवारी एका पत्रकार परिषदेत या शस्त्रक्रियेविषयी उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. प्रशांत उदगिरे, डॉ. योगेश बेलापूरकर, डॉ. नागेश जांबुरे यांनी माहिती दिली. या रुग्णाला २ वर्षांपासून कष्टाची कामे केल्यानंतर दम लागत असे. छातीत दुखणे, चक्कर येणे असाही त्रासही होत होता. प्रारंभी रुग्णाने लठ्ठपणाबद्दल उपचार घेतले. परंतु टुडी इको, कलर डाॅपलरच्या तपासणीतून रुग्णाला एओरटिक व्हॉल्व्ह, जो शरीराच्या उ‌र्वरित भागाला हृदयाशी जोडतो, तो आकाराने लहान झाल्याचे निदान झाले. त्यामुळे झडप उघडणे प्रतिबंधित होऊन शरीराच्या उर्वरित भागात रक्त प्रवाहात अडथळा होत होता. त्यामुळे ट्रान्सकॅथेटर एओरटिक व्हाॅल्व्ह रिप्लेसमेंट इंटरव्हेंशनल कार्डीओलाॅजीतील जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली. पारंपरिक उपचारात ओपन हार्ट शस्त्रक्रियेद्वारे झडप बदलली जाते; परंतु या रुग्णाचे हृदय उघडे न करता झडप बदलण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आता चालताना कोणताही त्रास होत नाही, असे रुग्णाने सांगितले.

चौकट..

शस्त्रक्रिया करणारे डाॅक्टर्स

अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बाेहरा, डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत उदगिरे, डॉ. योगेश बेलापूरकर, डॉ. अभिनव छाबडा, डॉ. राहुल पटणे, डॉ. सागर दिवेकर, डॉ. प्रीतेश इंगोले, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. नागेश जांबुरे, डॉ. अजिता अन्नछत्रे यांनी ही शस्त्रक्रिया केली.