औरंगाबाद : ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिकस्तरावर इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे, यासाठी औरंगाबादेत १४ फेब्रुवारी रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शिक्षण शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. शहरातील १० परीक्षा केंद्रांवर २२०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ही परीक्षा आॅल इंडिया एज्युकेशन रिसर्च अकॅडमीच्या वतीने घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, जळगाव रोडवरील इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वर्गनिहाय निकाल दिला जाणार आहे. यामध्ये १५ मार्च रोजी सिनिअर केजी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांना निकाल दिला जाईल.१६ मार्च रोजी इयत्ता २ री, १७ मार्च रोजी इयत्ता ३ री, १८ मार्च रोजी इयत्ता ४ थी आणि १९ मार्च रोजी इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा निकाल दिला जाणार आहे. या तारखांनुसार काही विद्यार्थ्यांना निकाल घेणे शक्य न झाल्यास त्यांना २१ व २२ मार्च रोजी निकाल दिला जाईल. निकाल घेण्यासाठी येताना पालकांनी विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र सोबत आणणे गरजेचे आहे, असे इरा शाळेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
By admin | Published: March 15, 2016 12:31 AM