शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सत्तार अन् मी जुने मित्र, भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू; खासदार काळेंचा दानवेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 19:17 IST

आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे: कल्याण काळे

सिल्लोड/ भराडी: रावसाहेब दानवे यांना हिंदुत्व आता दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात महिलांवर लाठी हल्ला झाला त्यावेळी ते कुठे गेले होते. आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे. अब्दुल सत्तार व मी जुने मित्र आहोत अन् आम्ही मैत्री निभावणार. दोघे सोबत काम करून मतदार संघाचा विकास करू. भोकरदनची मनमानी मोडित काढू, असा इशारा खासदार कल्याण काळे यांनी भराडी येथील सभेतून माजी खासदार रावसाहेब दानवे यांना दिला.

गुरुवारी दुपारी १२ वाजता  सिल्लोड  तालुक्यातील धानोरा येथील पूर्णा  नदीवर भुरडी नदी, वांगी बुद्रुक येथील गाव नाला तर उपळी व मांडगाव येथील अंजना नदीवर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर १२ कोटी ५५ लाख ८१ हजार रुपयांच्या एकूण ५ पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन खा. डॉ. कल्याणराव काळे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार होते. यावेळी सत्तार म्हणाले, सिल्लोड तालुक्यातील आणखी काही गावांसाठी ५० कोटींच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तालुक्यातील विकासासाठी आम्ही दोघे निधी कमी पडू देणार नाही. खा. कल्याणराव काळे यांच्या  पुढाकाराने अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही सत्तार यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे,  बाजार समितीचे सभापती केशवराव पा. तायडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, युवानेते माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, सुधाकर पाटील, प्रवीण मीरकर, राजू गौर, निजाम पठाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, व्हाईस चेअरमन अनिस पठाण, रमेश साळवे, दामूअण्णा गव्हाणे, सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन, गणेश गरुड यांची उपस्थिती होती.

भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढूतर खासदार काळे म्हणाले, आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे सिल्लोड मतदारसंघात झाली. ते सर्वांना सोबत घेऊन चालतात. त्यांची लोकप्रियता फार मोठी आहे. रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना काळे म्हणाले, दानवे यांना पराभव जास्तच जिव्हारी लागला. मला आणि आ. अब्दुल सत्तार यांना सोबत पाहून भोकरदनच्या भुवया उंचावतात. अब्दुल सत्तार यांनी पाच वर्षात १० हजार सिंचन विहिरींना मान्यता दिली. भोकरदनमध्ये एकही विहीर मंजूर नाही. शासनाच्या लाभाच्या योजना भोकरदन, जाफराबाद मधील लोकांना मिळत नाहीत. जालन्यात हम बोलेसो कायदा होता, पण आता तसे होणार नाही. त्यांची हुकूमशाही मोडीत काढू, असा इशारा खासदार काळे यांनी दिला. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेKalyan kaleडॉ. कल्याण काळेAbdul Sattarअब्दुल सत्तारchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर