शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

अबब...औरंगाबादच्या कचरा प्रक्रियेसाठी खर्च ५ कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:13 AM

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महापालिकेने ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात तब्बल ४३३ ठिकाणी कम्पोस्टिंग पीट तयार करण्याचे काम ...

ठळक मुद्देकचऱ्यात सोने : ओल्या कच-यावर प्रक्रियेसाठी कम्पोस्टिंग पीट उभारणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेने ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात तब्बल ४३३ ठिकाणी कम्पोस्टिंग पीट तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कामावर ५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करून फक्त ७० ते ८० टन कचºयावरच प्रक्रिया करण्यात येईल. शहरात दररोज किमान ३०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. उर्वरित ओल्या कचयाचे करणार काय? याचे उत्तर मनपाकडे नाही.शहरातील कचरा प्रश्न महापालिकेच्या दृष्टीने पूर्णपणे संपला आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोर कच-यावर केमिकल पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली. आकाशवाणी येथेही कचरा उचलण्यात आला. पदमपुरा येथील कचºयावर प्रक्रिया करण्यात आली. मध्यवर्ती जकात नाका येथे फक्त ३० टक्के कचरा आहे. औरंगपु-यातील कच-याचे डोंगरही आठ दिवसांत नष्ट करण्यात येणार असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पूर्वीच्या तुलनेत आज कचरा जास्त नसल्याचा दावा मनपाचा आहे.शहरातील कचरा कोंडी फोडण्यासाठी झोननिहाय कम्पोस्टिंग पीट तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोठ्या पीटवर पत्र्याचे शेडही उभारण्यात येत आहे. कायमस्वरूपी हे पीट राहणार आहेत. ४३३ कम्पोस्टिंग पीटसाठी ४ कोटी ८७ लाख ५९ हजार ९१५ रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एवढा अवाढव्य खर्च मनपा करीत असून, सर्व पीटवर ७० ते ८० टन ओल्या कचºयावरच प्रक्रिया होणार आहे. शहरात ४०० ते ४५० मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यात ३०० मेट्रिक टन ओला कचरा असतो. २०० मेट्रिक टन ओल्या कचºयाचे काय करणार याचे उत्तर मनपा प्रशासनाकडे सध्या तरी नाही.मशीन खरेदी ३ कोटीतएकीकडे कम्पोस्टिंगसाठी मनपा ५ कोटी रुपये खर्च करीत आहे. झोननिहाय मशीन खरेदीसाठी ३ कोटी १६ लाख ८० हजार रुपयांची निविदा प्रसिद्व करण्यात आली आहे. मनपाच्या नऊ झोनमध्ये या मशीन बसविण्यात येतील. सर्व मशीनवर किमान ३० ते ४० टक्के कच-यावर प्रक्रिया होईल, असा दावा मनपाचा आहे. चिकलठाण्यातील दुग्धनगरीच्या जागेवर केंद्रित प्रकल्प उभारण्यात येणार आहे.झोन       प्रस्तावित पीट           खर्चझोन १        ५८                  ४२ लाख ४७ हजारझोन २        १५                   १९ लाख ०६ हजारझोन ३        ७९                  ९० लाख ६२ हजारझोन ४        ४१                   ४३ लाख ७८ हजारझोन ५        ०१                   ३९ लाख ११ हजारझोन ६        ४५                  ९८ लाख ५५ हजारझोन ७         ९८                  ५३ लाख ५१ हजारझोन ८          १८                  ४९ लाख ४१ हजारझोन ९         ७८                  ५१ लाख ०३ हजार

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी