लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक प्रक्रिया मध्यात आली आहे. पदवीधर सोडून इतर गटातील पात्र उमेदवारांची गुरुवारीच यादी जाहीर करायची होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी व कुलसचिवांसोबत एका गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी घातलेल्या गोंधळामुळे ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे यादी सायंकाळपर्यंत जाहीर झाली नाही. यातच पदवीधरांच्या अंतिम मतदार यादीचा प्रश्न सुटला नसल्यामुळे नामांकन दाखल करण्याची तारीख तब्बल सहा दिवसांनी पुढे ढकलली आहे.विद्यापीठाच्या अधिसभेच्या प्राचार्य, संस्थाचालक, शिक्षक, विद्यापीठ शिक्षक आणि विद्यापरिषदेसाठी उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. या नामांकनाची छाननी झाल्यानंतर पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र विद्यापीठ विकास मंचच्या पदाधिकाºयांंसोबत बुधवारी रात्री झालेल्या बाचाबाचीनंतर निवडणूक निर्णय अधिका-यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी गुरुवारी विद्यापीठात आलेच नाहीत.
कुलसचिव अनुपस्थित; अधिसभा निवडणूक गोंधळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 1:22 AM