सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
------------------------------------------------
साखरपुड्यानंतर लग्नास नकार; अटकपूर्व जामीन नामंजूर
औरंगाबाद : साखरपुड्यानंतर मुलीच्या कुटुंबाकडे पैशांची मागणी करुन लग्नास नकार दिल्याच्या गुन्ह्यात रेखा बाबूराव कोंगळे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश व्ही.के. कदम यांनी नामंजूर केला.
-------------------------------------------------
दुचाकी चोराच्या पोलीस कोठडीत वाढ
औरंगाबाद : खडकेश्वर येथे हॅन्डल लॉक करुन उभी केलेली दुचाकी चोरणारा अतिक शेख लतीफ शेख याच्या पोलीस कोठडीत २२ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी मंगळवारी दिले. सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
----------------------------------------------------
पैसे हिसकावणाऱ्याला पोलीस कोठडी
औरंगाबाद : पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेलेल्या तरुणाच्या कारची काच फोडून त्याच्या खिशातील ७ हजार रुपये घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करणारा विनोद मारोती गायकवाड याला २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी मंगळवारी दिले. सहायक सरकारी वकील एस.आर. ढोकरट यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
-------------------------------------------
बलात्कारातील आरोपीचा जामीन नाकारला
औरंगाबाद : मोबाईलवरुन मैत्री केल्यानंतर अवघ्या १५ दिवसात प्रेमाच्या आणाभाका घेऊन, अल्पवयीन मुलीला खुलताबादला नेऊन तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात मनोज सुनील सतुके याचा नियमित जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी मंगळवारी नामंजूर केला. सहायक लोकअभियोक्ता मधुकर आहेर यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
-------------------------------------------------------