प्ारतूर: लग्नाचा बेत करून घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलास परतूर पोलिसांनी पुणे येथून अटक केली. लग्नाचे आमिष दाखविणाऱ्या तरूणास पोलिस कोठडी मिळाली तर अल्पवयीन मुलीस आई- वडिलांकडे जावे लागले. घनसावंगी तालुक्यातील काकडे कंडारी येथील प्रेमी युगूल ९ मार्च २०१७ रोजी घरातून बेपत्ता झाले होते. यातील आरोपी बाळू सखाराम तिगुले (२३) याने गावातीलच एका सतरा वर्षीय तरूणीस लग्नाचे आमिष दाखवून पळूवन नेले. याप्रकरणी मुलीचे वडिलांनी परतूर पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी गावातीलच एक आरोपीचा मित्र व मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीने या युगुलाचा शोध घेतला असता नेवाळे यांचा मळा, चिखली पुणे येथे हे युगूल एका किरायाच्या खोलीत राहत असल्याचे पोलिसांना आढळून आले. या ठिकाणाहून युगूलास ताब्यात घेवून परतूर येथे आणण्यात आले. यातील आरोपी तरूणास तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे, तर सुरूवातीस आई-वडिलांकडे जाण्यास नकार देणारी तरूणी समजूत घातल्यांनतर आई- वडिलांकडे जाण्यास तयार झाली. या युगुलाने आळंदी येथे साखरपुडा केल्याचे प्रमाणपत्र सापडले आहे. कारवाई व्ही. आर. जाधव, शाम गायके, सविता मुद्दलवार, सविता झेले यांनी केली.
प्रेमीयुगूल ताब्यात; तरुणास कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2017 12:32 AM