शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

काँग्रेस नेत्यांच्या गाडीला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 6:25 AM

औरंगाबाद-पुणे महामार्गावरील गंगापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी संजय चौपाने (५५, रा. ठाणे) यांचे निधन झाले.

औरंगाबाद : औरंगाबाद-पुणे महामार्गावरील गंगापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी संजय चौपाने (५५, रा. ठाणे) यांचे निधन झाले. तर नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, काँग्रेसचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत.औरंगाबाद येथील स्व. इंदिरा गांधी जन्मशताब्दी सोहळा आटोपून हे सर्व जण फॉर्च्युनर गाडीतून मुंबईकडे परतत असताना रविवारी सायंकाळी हा अपघात झाला. मोटारसायकलस्वाराला वाचविताना गाडीचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती दुभाजकावर आदळून बाजूच्या रस्त्यावरून औरंगाबादकडे जाणाºया खासगी बसला धडकली. या अपघातात गाडीतील संजय चौपाने जागीच ठार झाले. तर रमाकांत म्हात्रे, बाळकृष्ण पूर्णेकर, दत्ता म्हात्रे, दलजित बिस्त हे जखमी झाले. या जखमी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी तातडीने औरंगाबादला हलविले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मूळ यवतमाळचे रहिवासी असलेले संजय चौपाने हे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते ठाण्यात राहत होते.।ठाणे कॉँग्रेसवर शोककळादिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून काँग्रेस प्रदेश सचिव संजय चौपाने यांची ओळख होती. युवक काँग्रेसपासून पक्षात सक्रिय असलेले चौपाने यांनी युवक काँग्रेसमध्येही सचिव पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती.पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांचा वावर असे. याचदरम्यान त्यांची ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून नेमणूक झाली. सध्या ते महाराष्टÑ प्रदेश सचिव होते. त्यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूने ठाणे काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. अपघाताचे वृत्त समजताच काही नेते औरंगाबादला रवाना झाले.।त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, महाराष्टÑ प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह अनेकांना धक्का बसला.