सिल्लोड : परजिल्ह्यातून जनावरे चोरी करून त्यांना कारमध्ये कोंबून सुसाट वेगाने जात असलेल्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा धोत्रा दिग्रस फाट्यावरील चौकात अपघात झाला. ही घटना घडताच चौकाच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी धाव घेतली असता कारमधील चोरट्यांनी कार व जनावरे सोडून पळ काढला. ही घटना सोमवारी रात्री घडली. या कारमध्ये एक गोरा व तीन वासरांचा समावेश होता.
ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी वाहनाची तपासणी केली. जनावरांना कारमध्ये कोंबून नेले जात असल्याचा संशय आला. त्यामुळे ग्रामस्थांनी अजिंठा पोलिसांना घटनेची माहिती दिली. अजिंठा पोलिसांनी जनावरे व कार क्रमांक (एमएच १९ बीजे १२५१) ताब्यात घेतली आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोनि. अजित विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार के. जी. पवार, पोहेकॉ. आबासाहेब आव्हाड, अरुण गाडेकर करीत आहेत.
---
मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
ही जनावरे अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाहीत. कदाचित ती चोरीचे जनावरे परजिल्ह्यातील असावीत. बुलडाणा, जालना, भोकरदन पोलीस ठाण्यात या प्रकरणी विचारपूस सुरू आहे. कार, मोबाइलद्वारे चौकशी केली जात आहे. त्यामुळे जनावरे चोरी करणाऱ्यांचे रॅकेट नक्की उघडकीस येण्याची शक्यता आहे.
- अजित विसपुते, सहायक पोलीस निरीक्षक - अजिंठा.
310821\img-20210831-wa0471.jpg
क्याप्शन
अपघातग्रस्त याच एक्सयूव्ही वाहनात जनावरे चोरून नेण्यात येत होती.तिला अपघात झाला...