खुलताबाद : वाहन चालवितांना वाहनधारकांनी नियमांचे पालन केल्यास अपघात होणार नाही व यामुळे अपघातांची संख्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल. त्याकरिता वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी केले.
खुलताबादेतील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने भद्रा मारुती मंदिर परिसरात ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे चित्ररथाची माहिती देऊन लोकांना जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड यांची उपस्थिती होती.
दरम्यान, मंदिर परिसरातील भाविक व ग्रामस्थांना वाहतूक नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांनी चित्ररथाची माहिती देत जनजागृती व प्रबोधन केले. यावेळी सहायक फौजदार विश्वासराव पडूळ, पोलीस कॉन्स्टेबल अझर खान, पोलीस नाईक श्रीकांत चेळेकर, राजू लघाणे, अमर आळंजकर, आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
----------------------
फोटो कँप्शन : खुलताबाद भद्रा मारुती मंदिर परिसरात महामार्ग मदत केंद्राच्या वतीने चित्ररथाच्या माध्यमातून वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड.