संजय बाळासाहेब ठोंबरे (रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपी इंदुबाई संजय ठोंबरे, सचिन संजय ठोंबरे, नितीन संजय ठोंबरे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे.
पडेगाव येथील तक्रारदार रेखा भगवानराव गायकवाड यांना आरोपी ठोंबरेने दोन वर्षांत दामदुप्पट रक्कम करून देतो, असे आमिष दाखविले. पैशाची हमीही त्याने घेतली. आरोपी कॉलनीतील रहिवासी असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक केली. यानंतर नंदा संभाजी गजले, मथुरा भिका घुगे, हमिदा अमीर खान पठाण, हरिदास नामदेव पवार यांच्याकडून प्रत्येकी २ लाख १६ हजार, सुमन शंकर घोडके यांच्याकडून ३ लाख ६ हजार आणि लता वसंत गवदे यांच्याकडून एक लाख ८ हजार असे १४ लाख ९४ हजार रुपये गोळा केले. गायकवाड यांनी फेब्रुवारी २०१८ रोजी सुमन घोडके आणि इंदुबाई संजय ठोंबरे यांना दोन लाख १६ हजार रुपये रोख दिले. मुदत ठेवीचा दोन वर्षांचा कालावधी संपल्यावर तक्रारदाराने त्याच्याकडे पैशाची मागणी केली. तेव्हा वेगवेगळी कारणे सांगून तो पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. कोरोनाच्या कालावधीत तो कुटुंबासह गावी निघून गेला. जुलै २०२० काही गुंतवणूकदार ठोंबरेच्या गावी गेले असता संजयच्या मुलाने त्यांना धमकावून हाकलून दिले होते. यानंतर गुंतवणूकदारानी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला होता. आज संजय ठोंबरे शहरात आल्याची माहिती मिळताच फौजदार पी. एस. भागिले यांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक केली.