लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अल्पवयीन मुलाचा लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस सहा वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड अप्पर सत्र न्यायाधीशांनी सुनावला आहे.शहरातील दर्गारोड परिसरामध्ये एक मुलगा खेळत असताना त्याला चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपीने पडक्या घरात नेले होते. त्या ठिकाणी त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. २०१४ मध्ये ही घटना घडली होती. घटनेनंतर मुलाच्या पित्याने कोतवाली पोलिसांकडे फिर्याद दिली. पीडित मुलगा हा अल्पवयीन असल्याने आरोपी स.आसेफ स.रशीद याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात तपास करुन पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी न्यायालयास आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अप्पर सत्र न्यायाधीश एस.जी. ठुबे यांनी आरोपीस स.आसेफ स.रशीद यास सहा वर्षांचा सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड अशी शिक्षा १० नोव्हेंबर रोजी सुनावली. तसेच पीडिताला १५ हजार रुपयांचा मावेजा देण्याचा आदेश दिला. सरकारी वकील एम.ओ. मंत्री यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.
आरोपीस सहा वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:22 AM