शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या ४८ ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 7:19 PM

निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यापूर्वी यादीतील नावे तपासण्यात येतात.

ठळक मुद्दे ७२९ जणांवर पाच वर्षे बंदी निवडणूक खर्च सादर न केल्याने आले अडचणीत 

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्यानंतर खर्चाचा हिशेब सादर न करणाऱ्या ४८ विद्यमान सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या कारवाईचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. तसेच निवडणूक लढले; पण पराभूत झाल्याने खर्चाचा हिशेब न देणाऱ्या ७२९ उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना आॅक्टोबर २०१७, नोव्हेंबर २०१७ आणि मार्च २०१८ पर्यंत निवडणूक खर्च हिशेब देणे बंधनकारक होते. मात्र, उमेदवारांनी खर्च सादर करण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने ३१ मे २०१८ रोजी संबंधितांना नोटिसा बजावून सूचित केले होते. त्यानंतरही नोटिसांना उमेदवारांनी प्रतिसाद दिला नस्सल्याची बाब समोर आली. 

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी ५ डिसेंबर २०१८ रोजी ७७७ उमेदवारांना अपात्र घोषित करण्याचे आदेश काढले. यामध्ये निवडून आलेल्या ४८ ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७, मार्च आणि मे २०१८ या कालावधीत मुदत संपलेल्या, नवीन स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत प्रचाराच्या मर्यादेसह केलेल्या खर्चाचा हिशेब आयोगाकडे सादर करणे बंधनकारक होते. 

यादी निवडणूक विभागाकडे देणार खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांची यादी निवडणुकी वेळी संबंधित विभागाकडे सादर करण्यात येईल. निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यापूर्वी यादीतील नावे तपासण्यात येतात. अपात्रतेची कारवाई करण्यात आलेल्या उमेदवारांना अर्ज भरून निवडणूक लढता येणार नाही, असे सामान्य जिल्हा प्रशासन विभागाने स्पष्ट केले. 

जिल्हा प्रशासनाने कारवाई केलेल्या उमेदवारांची संख्यातालुका    उमेदवार     सदस्यऔरंगाबाद    ५८        ००वैजापूर    ८७        १३कन्नड    १२१        १३सिल्लोड    ५१        ००सोयगाव    १८        ००पैठण        १८६        ०१खुलताबाद    १३        ००फुलंब्री    ५६        १३गंगापूर    १८७        ०८एकूण        ७७७        ४८

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत