जालनारोडवरील अपना बाजार कॉम्पलेक्स येथे असलेल्या गुरुमितसिंग कर्नलसिंग बिंद्रा (५५,रा.सिडको) यांच्या कार डेकोरेटर्स शॉप आणि अमित प्रेमचंद जैन (४८, रा. अहिंसानगर, महेशनगर) यांच्या सेवा ऑटोमोबाइल शॉप या दुकानातून एका नामांकिचे कारचे बनावट स्पेअरपार्ट विक्री होत असल्याची माहिती संबंधित कंपनीचे वरिष्ठ अधिकारी रेवणनाथ विष्णू केकाण (३९, रा.हडपसर, पुणे) यांना मिळाली होती. रेवणनाथ केकाण यांनी याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर, जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने कार डेकोरेटर्स शॉप आणि सेवा ऑटोमोबाइल शॉप या दुकानांवर छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी संबंधित कंपनीचे बनावट ऑइल सील, ऑइल कुलंट, हेडलाइट स्वीच ॲसेम्बली, वॉल वॉकर, टी. पी. सेन्सर जप्त केले. तसेच किसा कंपनीचे कप व्हॅल्यू, ग्लास रबर सेट आदी मिळून जवळपास ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन्ही दुकानदारांविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:02 AM