लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कुंटणखाना चालविणा-या दोन वेगवेगळ्या ठिकाणी शहर व ग्रामीण गुन्हे शाखेने कारवाई केली असून, पिटा अॅक्टप्रमाणे एक दलाल व अंटीवर गुरुवारी गुन्हे दाखल केले आहेत.शहरातील विदेशी महिलेचा वेश्यागमन व्यवसाय ‘स्पा’च्या कारवाईनंतर पोलिसांनी कुंटणखान्याची पालेमुळे शोधण्याकडे लक्ष वेधले असून, डीएमआयसीच्या कार्यक्षेत्रात येणाºया दलालास चितेगावात ग्रामीण गुन्हे शाखेने छापा मारून पुरुष दलालावर कारवाई केली.याविषयी बिडकीन पोलीस ठाण्यात पिटा अॅक्टप्रमाणे लियाकत हनीफ पठाण (३१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर, स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, बिडकीन पोलीस ठाण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार सचिन कापुरे, गणेश जाधव यांच्या पथकाने केली. दलाल हा ग्राहकाकडून मिळणाºया पैशातून अर्धे स्वत: ठेवून अर्धे महिलेला देत होता. पोलीस छाप्यात कुंटणखान्यात निरोधाची पाकिटे व पैसे पोलिसांना मिळाले आहेत.बुढीलेन येथे महिला दलालावर गुन्हा दाखलबुढीलेन नेहरू भवनजवळ दलाल महिला ही तिच्या घरी वेश्या व्यवसाय चालवीत होती. वेश्यागमनासाठी स्वत:च्या घरात जागा उपलब्ध करून देण्यात येत असे, खबºयाने दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे फौजदार नंदकुमार भंडारे यांच्या टीमने बुढीलेन परिसरात ग्राहक पाठवून छापा मारला असता, ही महिला इतर तीन महिलांकडून पैसे घेऊन व्यवसाय करून घेत असल्याचे उघड झाले. मोबाईल व इतर साहित्य खोलीतून जप्त केले असून, सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, या महिलांना न्यायालयाने १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेहरू भवनजवळ कुंटणखान्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:57 AM